धनुष-मृणालचं शुभमंगल सावधान! चर्चांना उधाण; अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीची प्रतिक्रिया समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:35 IST2026-01-17T09:25:15+5:302026-01-17T09:35:26+5:30
दोन मुलांच्या बाबासोबत मृणालच्या अफेअरच्या चर्चा, लग्नही करणार?

धनुष-मृणालचं शुभमंगल सावधान! चर्चांना उधाण; अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीची प्रतिक्रिया समोर
फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. या महिन्यात अनेक लव्हबर्ड्स लग्न करतात. बॉलिवूडमध्येही लग्नाचे वारे पाहत आहेत. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना ही लाडकी जोडी पुढच्या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. तर दुसरीकडे काल अचानक धनुष आणि अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या लग्नाची बातमी पसरली. दोघंही फेब्रुवारीत लग्न करणार असल्याचं समोर आलं आणि चाहत्यांना धक्काच बसला. आता यामागचं खरं सत्य समोर आलं आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या जवळच्या व्यक्तीने स्पष्ट केलं की या सगळ्या अफवा आहेत. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत मृणालच्या निकटवर्तियाने सांगितलं की, "मृणाल पुढच्या महिन्यात लग्न करणार नाही. काहीही कारण नसताना या अफवा पसरल्या आहेत. सध्या मृणालकडे अनेक प्रोफेशनल कमिटमेंट्स आहेत. अशात पुढील महिन्यात तिचं लग्न होणार हे शक्यच नाही. तिचं पूर्ण लक्ष करिअरवर आहे."
धनुष आणि मृणालच्या अफेअरच्या चर्चां कधी सुरुवात झाली?
धनुषचा सिनेमा 'तेरे इश्क मे'च्या वेळी मृणालही त्याच्यासोबत दिसली होती. धनुष, क्रिती सेनन त्यांच्या मित्रपरिवारासोबत होते तेव्हा मृणालही त्यात होती. शिवाय धनुषने मृणालला स्क्रीनिंगवेळी खास आमंत्रण दिलं होतं. त्यावेळीही दोघं सोबत दिसले होते. सोशल मीडियावरही मृणालने धनुषचं कौतुक केलं ज्यावर अभिनेत्यानेही प्रतिक्रिया दिली. यावरुनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
धनुषचं २००४ मध्येच रजनीकांतची लेक ऐश्वर्यासोबत लग्न झालं होतं. त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मोठी मुलं आहेत. २०२४ साली धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेतला. त्यांचा २० वर्षांचा संसार मोडला. अशाच दोन मुलांचा बाबा असलेल्या धनुषसोबत मृणालच्या अफेअरच्या चर्चांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.