विकी कौशलच्या 'महावातर'मध्ये दीपिका पादुकोणची एंट्री? जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:36 IST2025-12-10T17:35:03+5:302025-12-10T17:36:21+5:30
Deepika Padukone In Mahavatar Movie : विकी कौशलच्या पौराणिक चित्रपट 'महावतार'ला त्याची मुख्य अभिनेत्री मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि विकी कौशलची जोडी बनू शकते.

विकी कौशलच्या 'महावातर'मध्ये दीपिका पादुकोणची एंट्री? जाणून घ्या याबद्दल
विकी कौशलच्या आगामी 'महावतार' चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये बऱ्याच काळापासून उत्सुकता आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २०२६ मध्ये नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलच्या विरुद्ध कोणती अभिनेत्री असेल, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता या रहस्यावरून पडदा उठला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोण या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री असणार आहे.
खरंतर, नुकतेच दीपिका पादुकोणला मुंबईतील मॅडॉक फिल्म्सच्या ऑफिसमध्ये पाहिलं गेलं. तिच्या उपस्थितीमुळे चाहते आणि इंडस्ट्री या दोन्हीमध्ये उत्सुकता वाढली आहे. 'मिड-डे'च्या रिपोर्टनुसार, 'महावतार'चे निर्माते बऱ्याच काळापासून अशा अभिनेत्रीच्या शोधात होते, जी भगवान परशुरामांसोबतच्या भूमिकेत गांभीर्य आणि भावनिक खोली आणू शकेल.
दीपिका पादुकोणची अशी लागली वर्णी
'महावतार'च्या टीमला दीपिका पादुकोणहून उत्तम दुसरी कोणी अभिनेत्री वाटली नाही. दीपिका पादुकोणच विकी कौशलसोबत योग्य वाटेल. त्यामुळे दीपिका आणि निर्मात्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे, पण ती अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. जर दीपिकाने या चित्रपटाला होकार दिला, तर पहिल्यांदाच ती विकीसोबत काम करताना दिसेल. रिपोर्टनुसार, दीपिका ही त्या प्रमुख नावांपैकी एक आहे, जिच्याशी स्टुडिओने संपर्क साधला आहे. रिपोर्टमध्ये हे देखील सांगण्यात आले की, विकीचा हा पौराणिक ड्रामा भगवान परशुरामच्या कथेवर आधारित आहे. त्यामुळे स्त्री मुख्य पात्राची भूमिकाही सशक्त असणार आहे.
'महावतार' चित्रपटाबद्दल
'महावतार' चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करत आहेत, तर अमर कौशिक हे दिग्दर्शन करणार आहेत. नुकतेच अमर कौशिक यांनी पीटीआयशी बोलताना या चित्रपटाला त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात खास आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रोजेक्टपैकी एक म्हटले होते. हा प्रोजेक्ट 'दैवी देणगी' असल्याचे ते मानतात. याचसोबत त्यांनी चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबद्दल सांगितले होते की, स्त्री पात्राला कथानकात समान दर्जा मिळायला हवा.