८ तासांच्या शिफ्टमुळे दीपिकाच्या हातून सिनेमे गेले; आता 'या' सिनेमात अक्षय कुमारसह करणार कॉमेडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:11 IST2026-04-08T13:08:47+5:302026-04-08T13:11:10+5:30

अलीकडच्या काळात आई झाल्यानंतर ८ तासांच्या शिफ्टची मागणी केल्याने दीपिकाच्या हातून अनेक बिग प्रोजेक्ट्स गेले. पण आता दीपिका एका मल्टी स्टारर बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे.

Deepika Padukone will be seen in golmaal 5 movie rohit shetty akshay kumar ajay devgn | ८ तासांच्या शिफ्टमुळे दीपिकाच्या हातून सिनेमे गेले; आता 'या' सिनेमात अक्षय कुमारसह करणार कॉमेडी

८ तासांच्या शिफ्टमुळे दीपिकाच्या हातून सिनेमे गेले; आता 'या' सिनेमात अक्षय कुमारसह करणार कॉमेडी

अलीकडच्या काळात आई झाल्यानंतर ८ तासांच्या शिफ्टची मागणी केल्याने दीपिकाच्या हातून अनेक बिग प्रोजेक्ट्स गेले. पण आता दीपिका एका मल्टी स्टारर बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' या सुपरहिट फ्रँचायझीच्या पाचव्या भागाची म्हणजेच 'गोलमाल ५' (Golmaal 5) ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटात बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पदुकोण या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

अक्षय कुमार आणि दीपिका पुन्हा एकत्र

काही मीडिया रिपोर्टनुसार, 'गोलमाल ५' मध्ये केवळ अजय देवगण आणि त्याची गँगच नाही, तर अक्षय कुमार देखील एका खास भूमिकेत दिसणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटात दीपिका पादुकोणची एक 'स्पेशल कॅमिओ' भूमिका असणार आहे. यानिमित्त अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोण ही जोडी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

रोहित शेट्टीच्या 'कॉमेडी युनिव्हर्स'चा भाग?

रोहित शेट्टी सध्या त्याचे 'कॉप युनिव्हर्स' (सिंघम, सिंबा, सूर्यवंशी) वाढवण्यात व्यस्त आहे, पण आता तो 'गोलमाल'च्या माध्यमातून आपले 'कॉमेडी युनिव्हर्स' देखील एका वेगळ्या उंचीवर नेण्याच्या तयारीरित आहे. दीपिका पदुकोणने यापूर्वी रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये आणि 'सिंघम अगेन' मध्ये काम केले आहे, त्यामुळे तिची कॉमेडी टायमिंग प्रेक्षकांना आधीच माहिती आहे. आता 'गोलमाल ५' मध्ये दीपिका 'सिंघम अगेन'मधील रुपात अर्थात पोलीस अधिकारी शक्ती शेट्टीच्या भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे ती कोणती धमाल उडवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

चित्रपटाची तगडी स्टारकास्ट

'गोलमाल ५' मध्ये अजय देवगणसोबतच अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि श्रेयस तळपदे हे कलाकार त्यांच्या जुन्याच अंदाजात परतणार आहेत. आता त्यात अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोण यांसारख्या दिग्गज कलाकारांची नावे जोडली गेल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल यात शंका नाही. सध्या तरी 'गोलमाल ५'चं शूटिंग सुरु असून हा चित्रपट कधी रिलीज होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title : दीपिका की वापसी: शिफ्ट की मांग के बाद अक्षय कुमार के साथ 'गोलमाल 5'!

Web Summary : मातृत्व के बाद, दीपिका पादुकोण 8 घंटे की शिफ्ट की मांग के कारण प्रोजेक्ट खोने के बाद अक्षय कुमार के साथ 'गोलमाल 5' में शामिल हो गई हैं। वह कथित तौर पर रोहित शेट्टी के कॉमेडी यूनिवर्स में एक पुलिस अधिकारी की भूमिका निभाएंगी।

Web Title : Deepika's comeback: 'Golmaal 5' with Akshay Kumar after shift demands!

Web Summary : Post-maternity, Deepika Padukone joins 'Golmaal 5' with Akshay Kumar after losing projects due to her request for 8-hour shifts. She will reportedly play a police officer in Rohit Shetty's comedy universe.