दीपिका पादुकोण - रणवीर सिंग झाले सुनील गावस्कर यांचे शेजारी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 07:39 AM2018-01-11T07:39:24+5:302018-01-11T13:09:24+5:30

दीपिका पादुकोणच्या बर्थ डे च्या दिवशी ती आणि रणवीर सिंग साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. मात्र ही गोष्ट केवळ ...

Deepika Padukone - Ranveer Singh turned Sunil Gavaskar's neighbor? | दीपिका पादुकोण - रणवीर सिंग झाले सुनील गावस्कर यांचे शेजारी ?

दीपिका पादुकोण - रणवीर सिंग झाले सुनील गावस्कर यांचे शेजारी ?

googlenewsNext
पिका पादुकोणच्या बर्थ डे च्या दिवशी ती आणि रणवीर सिंग साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. मात्र ही गोष्ट केवळ अफवा निघाली. दीपिकाचा बर्थ डे सिक्रेटली साजरा करुन ते  श्रीलंकेतून परतले आहे. दीपिकाच्या वाढदिवसाला रणवीरच्या कुटुंबीयांनी तिला गिफ्ट म्हणून डायमंडचा सेट आणि  सब्यासाची डिझाइनर साडी गिफ्ट म्हणून दिली होती.  त्यामुळे आता त्याच्या लग्नाच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. दोघांची घरी लग्नाची जय्यत तयारी सुद्धा सुरु झाली आहे. दोघे ही आपल्या नात्याला घेऊन सीरिअस आहेत. नात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी दोघांनी गोव्यामध्ये घरं खरेदी केले आहे. याआधी दोघांनी मुंबईत घर खरेदी केले आहे.  रिपोर्टनुसार याच परिसरात सुनील गावसकर आणि रघुराम राजन यांचे घरं देखील आहे. 

काही दिवसांपूर्वी दीपिका नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये आली होती. या चॅट शो अजून ऑन एयर झालेला नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार या शोमधील काही खास गोष्टीसमोर आल्या आहेत. रिपोर्टनुसार यात दीपिकाला लग्नात कोणत्या डिझायनरची साडी नेसणार असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने सब्यासाची नावं सांगितले. त्यामुळे एक गोष्ट नक्की रणवीर आणि दीपिका लवकरात लवकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. व्हॅकेशनवरुन परतल्यानंतर दीपिका रणवीरची बहिण आजारी बहिणीलादेखील बघायला गेली होती. 

ALSO RAED :  ‘पद्मावत’ला कुठल्या संघटनेने नव्हे तर गोवा पोलिसांनीच केला विरोध, राज्य सरकारला लिहिले पत्र!

दरम्यान, दोघेही आगामी ‘पद्मावत’ या चित्रपटात झळकणार आहेत. सध्या त्यांचा हा चित्रपट प्रचंड वादाच्या भोवºयात सापडला होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने तोडगा काढत चित्रपटाते नाव आणि काही बदल करुन रिलीज करण्यास परवानगी दिली आहे. मात्र तरीही  चित्रपटाला राजपूत संघटनेचा सातत्याने विरोध होत आहे. चित्रपटात दीपिकाने राणीची भूमिका साकारली आहे. तर रणवीर अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग प्रथमच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिद कपूरने सहा प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. अक्षय कुमारच्या पॅडमॅनसोबत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   

Web Title: Deepika Padukone - Ranveer Singh turned Sunil Gavaskar's neighbor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.