Deepika-Ranveer बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चं सी फेसिंग ड्रीम होतेय तयार, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 11:47 IST2022-11-30T11:41:02+5:302022-11-30T11:47:27+5:30

Deepika-Ranveer: दीपवीरने या अलिशान अपार्टमेंटसाठी सुमारे 119 कोटी रुपये मोजल्याचे म्हटले जात आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतायेत.

Deepika Padukone Ranveer Singh sea facing 119 crore under construction flat in mumbai video viral | Deepika-Ranveer बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चं सी फेसिंग ड्रीम होतेय तयार, Video व्हायरल

Deepika-Ranveer बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चं सी फेसिंग ड्रीम होतेय तयार, Video व्हायरल

Deepika-Ranveer New Home Construction Video:  बॉलिवूडचं पॉवर कपल रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone )ने एका टॉवरमध्ये एक अलिशान  सी फेसिंग अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपवीरने या अलिशान अपार्टमेंटसाठी सुमारे 119 कोटी रुपये मोजल्याचे म्हटले जात आहे. रणवीरचे हे घर देशातील महागड्या घरांपैकी एक आहे. रणवीर व दीपिका यांनी शाहरूख खान आणि सलमान खानचं शेजारी होणार आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या अंडरकन्स्ट्रक्शन घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बिल्डिंगचं काम वेगाने सुरू असल्याचं दिसत आहे. व्हिडिओनुसार, दीपिका आणि रणवीरच्या नवीन घराची बाह्य रचना तयार आहे. त्यांच्या नवीन सी-फेसिंग ड्रीम होममध्ये शिफ्ट होण्यासाठी थोडा वेळ लागेल असंच हा व्हिडीओ पाहून दिसतंय.

रणवीर नुकताच एक अवॉर्ड शो दरम्यान म्हणाला की, "अखेर मी 12 वर्षांनी माझं घरं खरेदी केलं. दीपिकाने घरं  सजवण्याचं काम बंगळुरूच्या एका इंटिरियर डिझायनरला दिलं आहे. आम्ही गेली 10 वर्षे एकत्र आहेत."


दीपिका-रणवीर वर्कफ्रंट
वर्क फ्रंटवरबाबत बोलयाचे झाले तर, दीपिका शेवटची भूमिका 'गहराईंया' चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य कावा आणि अनन्या पांडे यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारताना दिसली होती. लवकरच दीपिका पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण'मध्ये दिसणार आहे. तर रणवीर सिंग लवकरच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' आणि करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहे.

Web Title: Deepika Padukone Ranveer Singh sea facing 119 crore under construction flat in mumbai video viral