'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:36 IST2025-06-06T11:35:22+5:302025-06-06T11:36:01+5:30

बीटाऊनमध्ये सध्या दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट मागणीची चर्चा आहे.

deepika padukone out of kalki 2 also makers planning to cut her role due to her shift demand | 'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात

'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात

बीटाऊनमध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि संदीप रेड्डी वांगा यांच्यातील वाद चर्चेत आहे. आई झाल्यानंतर दीपिकाने आता ८ तासांच्या शिफ्टची मागणी केली आहे. याला वांगा यांनी विरोध करत तिला 'स्पिरिट' सिनेमातून बाहेर काढलं. इंडस्ट्रीतील अनेकांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे आता दीपिकाला 'कल्कि २' (Kalki 2) मधूनही बाहेर काढल्याची चर्चा आहे. 'कल्कि २'चे मेकर्स दीपिकाची भूमिका कमी करण्याचा किंवा थेट हटवण्याचाच विचार करत आहेत.

बॉलिवूड मोबीच्या रिपोर्टनुसार, कमी तासांची शिफ्ट संदर्भातील मागणीमुळे कल्कि २ चे मेकर्स दीपिकाची भूमिका कमी करण्याच्या किंवा हटवण्याचा विचारात आहे. सेटवरील फ्रिक्शनमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या सिनेमातही तिच्यासोबत अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत होता. 'कल्कि' च्या पहिल्या भागाच्या शूटिंगवेळी दीपिका प्रेग्नंट होती. तरी तिने शूटिंग पूर्ण केलं होतं. मात्र आता तिच्या मागण्यांमुळे मेकर्सने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

काय आहेत दीपिकाच्या मागण्या?

सप्टेंबर महिन्यात दीपिका पादुकोणने लेकीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर ती 'स्पिरिट' सिनेमात दिसणार हे निश्चित होतं. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित या सिनेमात काम करण्यासाठी दीपिकाने अटी ठेवल्या. आई झाल्यानंतर ८ तासांच्या शिफ्टची तिने मागणी केली. तसंच सिनेमाचा प्रॉफिट शेअरही मागितला. इतकंच नाही तर तब्बल २० कोटींच्या मानधनाची मागणी केली. या सर्व मागण्या वांगा यांना मान्य नव्हत्या म्हणून त्यांनी तिला सिनेमातून काढलं. आता तिच्या जागी तृप्ती डिमरीला घेण्यात आलं आहे. तृप्ती सिनेमासाठी ४ कोटी  मानधन घेत आहे.

Web Title: deepika padukone out of kalki 2 also makers planning to cut her role due to her shift demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.