दीपिका पादुकोण की नयनतारा, 'किंग'मध्ये कोणासोबत रोमांस करणार शाहरूख खान?, अभिनेत्याने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:43 IST2025-11-04T18:43:05+5:302025-11-04T18:43:35+5:30
Shah Rukh Khan's King Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने त्याच्या वाढदिवसादिवशी त्याचा आगामी सिनेमा 'किंग'चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

दीपिका पादुकोण की नयनतारा, 'किंग'मध्ये कोणासोबत रोमांस करणार शाहरूख खान?, अभिनेत्याने केला खुलासा
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा ६०वा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी कोणत्या उत्सवापेक्षा कमी नाही. किंग ऑफ रोमांसने आपल्या खास दिवशी त्याचा आगामी सिनेमा किंगचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. त्यानंतर या सिनेमाबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. यातील शाहरूखची भूमिका काय असणार, त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री दिसणार आहे ? या दरम्यान शाहरूख खानने म्हटलं की, सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पादुकोणदेखील आहे तर प्रेमही असेल. त्यानंतर चाहत्यांना प्रश्न पडला की, किंगमध्ये दीपिकासोबत रोमांस करणार की नयनतारासोबत?
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात हिट ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक आहे. 'ओम शांती ओम'पासून ते 'पठाण' आणि 'जवान'पर्यंत या दोघांनी प्रत्येक वेळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'किंग' चित्रपटातही दीपिका शाहरुखची प्रेयसी म्हणून दिसणार आहे. शाहरुख खानने एका कार्यक्रमात सांगितले की, चित्रपटाची कथा यावर आधारित आहे की, जेव्हा आपण केवळ भावनांच्या आधारावर कोणताही निर्णय घेतो, तेव्हा तो निर्णय आपले जीवन कसे बदलतो.
नयनताराचीही सरप्राईज एन्ट्री
यासोबतच, 'जवान' चित्रपटातील स्टार नयनताराचा 'किंग'मध्ये स्पेशल कॅमिओ असण्याची चर्चा आहे. जर असे झाले, तर प्रेक्षकांसाठी ही मोठी भेट ठरेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत, ज्यांनी 'पठाण'सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. शाहरुख खानने सांगितले की, सिद्धार्थ आनंदने एका नव्या प्रकारचा 'माचो हीरो' बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
'किंग'ची स्टारकास्ट
'किंग'च्या स्टारकास्टमध्ये अभिषेक बच्चन, अर्शद वारसी, जयदीप अहलावत, राघव जुयाल आणि सुहाना खान यांचा समावेश आहे. या चित्रपटात सुहाना खान देखील दिसणार आहे आणि अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.