सगळं जग रणवीरचं कौतुक करतंय, पण बायकोच शांत! 'धुरंधर २' बद्दल दीपिका पादुकोणने बाळगलं मौन, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 16:06 IST2026-03-22T16:03:43+5:302026-03-22T16:06:21+5:30

'धुरंधर २'च्या भव्य यशाच्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्याच गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती म्हणजे रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोणने अजूनही 'धुरंधर २'बद्दल एकही पोस्ट शेअर केली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Deepika Padukone kept silent about Dhurandhar 2 ranveer singh aditya dhar | सगळं जग रणवीरचं कौतुक करतंय, पण बायकोच शांत! 'धुरंधर २' बद्दल दीपिका पादुकोणने बाळगलं मौन, कारण काय?

सगळं जग रणवीरचं कौतुक करतंय, पण बायकोच शांत! 'धुरंधर २' बद्दल दीपिका पादुकोणने बाळगलं मौन, कारण काय?

रणवीर सिंगचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करत आहे. अवघ्या पहिल्या विकेंडमध्ये या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, या भव्य यशाच्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्याच गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती म्हणजे रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोणने अजूनही 'धुरंधर २'बद्दल एकही पोस्ट शेअर केली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दीपिकाने 'धुरंधर २' च्या यशाबद्दल अद्याप कोणतीही इन्स्टाग्राम पोस्ट, स्टोरी किंवा ट्विट केलेले नाही. तिने चित्रपटाच्या प्रीमियरलाही हजेरी लावली नव्हती. काही नेटकऱ्यांनी तर, दोघांच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 'धुरंधर'च्या पहिल्या भागावेळी दीपिकाने सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला होता, त्या तुलनेत 'धुरंधर २' रिलीज होऊन ४ दिवस झाले तरीही दीपिकाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

दुसरीकडे दीपिका पादुकोण काल रणवीरची आई आणि बहिणीसोबत एका म्यूझिक कॉन्सर्टला गेली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दीपिका नणंद आणि सासूबाईंशी मनमोकळ्या गप्पा मारताना आणि संगीताचा आनंद घेताना दिसत आहे. 

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध सतारवादक रिषभ रिखीराम शर्मा यांच्या 'मेंटल हेल्थ इंडिया टूर २०२६' या कॉन्सर्टमध्ये दीपिका सहभागी झाली होती. त्यामुळे यावरुन दीपिका-रणवीरमध्ये काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बाकी 'धुरंधर २' काहीच प्रतिक्रिया न देणं हा दीपिकाचा वैयक्तिक निर्णय आहे, असं म्हणत चाहते तिची बाजू घेत आहेत.

Web Title : रणवीर की फिल्म की सफलता: दीपिका 'धुरंधर 2' पर चुप क्यों?

Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर 2' बॉक्स ऑफिस पर हिट है, लेकिन दीपिका की चुप्पी अटकलों को हवा दे रही है। रणवीर के परिवार के साथ एक संगीत कार्यक्रम में भाग लेने के बावजूद, सोशल मीडिया पर उनकी प्रशंसा की कमी उनके रिश्ते के बारे में अफवाहों को बढ़ा रही है। प्रशंसक उनकी व्यक्तिगत पसंद का बचाव करते हैं।

Web Title : Ranveer's film success: Why is Deepika silent about 'Dhurandhar 2'?

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' is a box office hit, but Deepika's silence sparks speculation. Despite attending a concert with Ranveer's family, her lack of social media praise fuels rumors about their relationship. Fans defend her personal choice.