माझा नवरा दर सहा महिन्यांनी....; दीपिका पादुकोणला रणवीरबद्दल एकच तक्रार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:04 IST2021-12-31T15:03:19+5:302021-12-31T15:04:07+5:30
Ranveer Singh Deepika Padukone : रिअल लाईफमध्ये दीपिका व रणवीर एकमेकांसोबत आनंदी आहेत. पण प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याबद्दल असतात तशा तक्रारी दीपिकालाही आहेत बरं का!

माझा नवरा दर सहा महिन्यांनी....; दीपिका पादुकोणला रणवीरबद्दल एकच तक्रार!!
दीपिका पादुकोण ( Deepika Padukone) व रणवीर सिंग (Ranveer Singh) म्हणजे बॉलिवूडची सर्वात लाडकी जोडी. सध्या रणवीर सिंगवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. ‘83’ या चित्रपटात त्याने केलेल्या कामाचं भरभरून कौतुक होतंय. दीपिकानेही या चित्रपटात दमदार अभिनय आहे. रिअल लाईफमध्ये दीपिका व रणवीर एकमेकांसोबत आनंदी आहेत. पण प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याबद्दल असतात तशा तक्रारी दीपिकालाही आहेत बरं का! कधी कधी दीपिका स्वत: या तक्रारींचा पाढा (अर्थात गोड तक्रारी हं) वाचते तर कधी कधी रणवीर त्या जगासमोर आणतो.
रणवीर दर सहा महिन्याला बदलतो, अशी दीपिकाची एक तक्रार आहे आणि आता खुद्द रणवीरने असं का? तर यामागचं कारण सांगितलं आहे.
ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने बायकोला त्याच्याकडून असलेल्या तक्रारीबद्दल बोलला. तो म्हणाला, एखादा सिनेमा मी करायला घेतला की, त्या भूमिकेवर माझं काम सुरू होतं. त्या भूमिकेचं मी बारकाईने निरीक्षण करतो. कदाचित मी त्या भूमिकेत इतका गुंतत जातो की, रोजच्या जीवनातही माझ्यात अनेक बदल होतात. ते पाहून माझी बायको अनेकदा माझ्याबद्दल तक्रार करते. तू दर सहा महिन्याला बदलतोस, असं ती मला म्हणते. यावर, यात तुझाच फायदा आहे. तुला एकाच व्यक्तीचा कंटाळा येणार नाही, असं मी गमतीत तिला म्हणतो.
याआधी दीपिकाने ‘केबीसी’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांच्यासमोर अशीच नवऱ्याबद्दल एक गोड तक्रार केली होती. मी एक दिवस तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवेल, असं प्रॉमिस रणवीरने मला केलं होतं. पण आजपर्यंत असं काहीही झालं नाही, असं ती म्हणाली होती. यानंतर बिग बींनी रणवीरला लगेच फोन करत, दीपिकाला तुझ्याकडून एक तक्रार आहे, असं सांगितलं होतं. यावर, अब बच्चन साहबने बोल दिया हैं, अब तुम्हें गोद में बैठा कर आॅमलेट खिलाऊंगा, असं रणवीर म्हणाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.