'ती जेव्हा एखादं यश मिळवते..; दिपिकाच्या सक्सेसमुळे रणवीर आहे इनसिक्युअर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 17:15 IST2021-12-28T17:15:00+5:302021-12-28T17:15:00+5:30
Ranveer singh: अलिकडेच रणवीरने दिपिकाच्या यशासोबत स्वत:ची तुलना करण्याविषयी मत मांडलं आहे.

'ती जेव्हा एखादं यश मिळवते..; दिपिकाच्या सक्सेसमुळे रणवीर आहे इनसिक्युअर?
बॉलिवूडमधील (bollywood) सर्वाधिक लोकप्रिय आणि कायम चर्चेत राहणारी जोडी म्हणजे दीपिका पदुकोण (deepika padukone) आणि रणवीर सिंह (ranveer singh). आज हे दोन्ही कलाकार यशाच्या शिखरावर आहेत. परंतु, त्यांच्या वागण्यातील साधेपणाच चाहत्यांची मनं जिंकून घेतो. बऱ्याचदा ही जोडी त्यांच्यातील प्रेम, एअरपोर्टवरील लूक किंवा फॅशनसेन्स यांच्यामुळे चर्चेत येत असते. यात अनेकदा रणवीर तर त्याच्या अतरंगी स्टाइलमुळेच सर्वाधिक चर्चेत येतो. परंतु, यावेळी हा अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच त्याने दिपिकाच्या यशासोबत स्वत:ची तुलना करण्याविषयी मत मांडलं आहे. त्याने मांडलेले विचार पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.
दिपिकाच्या यश, प्रसिद्धीमुळे रणवीर आहे इनसिक्युअर?
सध्या रणवीर आणि दिपिका त्यांच्या '83' चं यश साजरं करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत या दोघांनी अनेक सक्सेस पार्टीत हजेरी लावली आहे. यामध्येच एका मुलाखतीत रणवीरने दिपिकाला तिच्या करिअरमध्ये मिळत असलेल्या यशावर भाष्य केलं आहे.
"मी मला मिळत असलेल्या स्क्रिनमुळे कायमच सिक्युअर असतो. पण, ज्यावेळी माझ्या पत्नीला कशात यश मिळतं. ती यशस्वी होते. त्यावेळी मला सगळ्यात जास्त आनंद होतो. तू दुसऱ्या कलाकारांना पुढे येण्याची संधी देतो, असं जेव्हा लोक मला म्हणतात, तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो. मी आधीपासूनच असा आहे. मी कायम सिक्युअर फिल करतो. दिपिका जेव्हा एखादं यश मिळवते. त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद आणि अभिमान माझ्याशिवाय कोणालाच वाटत नसेल", असं रणवीर म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "ज्यावेळी मी दिपिकाला पहिल्यांदा भेटलो त्यावेळी ती खूप मोठी स्टार होती. माझ्यापेक्षा जास्त कमावत होती. पण, आजही मला तिच्या यशाचा अभिमान वाटतो."
दरम्यान, रणवीरची मुख्य भूमिका असलेला '83' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला यशस्वी होत आहे. या चित्रपटात रणवीरसोबत दिपिकानेदेखील स्क्रीन शेअर केली आहे.