होणाऱ्या बाळासाठी बाप्पाचा आशीर्वाद! रणवीर - दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी लीन, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 18:13 IST2024-09-06T18:12:28+5:302024-09-06T18:13:18+5:30
लवकरच आई-बाबा होण्यासाठी आतुर असलेले रणवीर - दीपिका सिद्धीविनायक गणपतीच्या दर्शनाला गेले आहेत (ranveer singh, deepika padukone)

होणाऱ्या बाळासाठी बाप्पाचा आशीर्वाद! रणवीर - दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी लीन, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण. रणवीर-दीपिका या जोडीवर चाहते मनापासून प्रेम करत असतात. दोघांच्या सिनेमांनाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. रणवीर-दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिका सध्या गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. अशातच दीपिकाचा हात हातात घेऊन रणवीर सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेला आहे. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रणवीर-दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी लीन
रणवीर-दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. या दोघांनी काहीच दिवसांपूर्वी खास फोटोशूट केलं. आता नुकतंच रणवीर-दीपिका सिद्धीविनायकाच्या चरणी लीन झाले आहेत. होणाऱ्या बाळासाठी बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला रणवीर-दीपिका प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात गेले आहेत. दीपिकाने हिरव्या रंगाची साडी यावेळी नेसली होती. तर रणवीरने प्लेन कुर्ता परिधान केला होता. रणवीर दीपिकाचा हात धरुन तिला सावरत मंदिरात प्रवेश करताना पाहायला मिळाला. या दोघांच्या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दिली असून होणाऱ्या बाळाला आशीर्वाद दिले आहेत.
या तारखेला दीपिकाला होणार बाळ
रणवीर दीपिकाच्या जवळच्या व्यक्तीने दीपिका आई कधी होऊ शकते याविषयी खुलासा केला. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, "दीपिका आणि रणवीर त्यांच्या आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी उस्तुक आहेत. दीपिका तिचा प्रेग्नंन्सीमधील काळ एन्जॉय करत आहे. जर ठरल्याप्रमाणे गोष्टी झाल्या तर दीपिका २८ सप्टेंबरला बाळाला जन्म देऊ शकते", अशी माहिती जवळच्या व्यक्तीने न्यूज १८ शी बोलताना दिली आहे. दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर आता ६ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.