Dasara Teaser : साऊथ सुपरस्टार नानीला पाहून 'पुष्पा'ला विसराल...! 'दसरा'चा धमाकेदार टीझर एकदा पाहाच...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:33 IST2023-01-31T12:32:57+5:302023-01-31T12:33:04+5:30
Nani Movie Dasara Teaser Out : 'पुष्पा'ला टक्कर द्यायला येतोय 'दसरा'...; 'दसरा' या नव्या साऊथ सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय.

Dasara Teaser : साऊथ सुपरस्टार नानीला पाहून 'पुष्पा'ला विसराल...! 'दसरा'चा धमाकेदार टीझर एकदा पाहाच...!!
Nani Movie Dasara Teaser Out : साऊथ इंडस्ट्रीच्या सिनेमांनी बॉलिवूडचा घाम फोडलाय. पुष्पा, आरआरआर, केजीएफ २, कांतारा ही त्याची काही उदाहरणं. या साऊथ सिनेमांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. आता साऊथचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचं नाव आहे 'दसरा'. तूर्तास साऊथ सुपरस्टार नानीच्या 'दसरा'चा टीझर रिलीज झाला आहे आणि हा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा टीझर पाहताच, तुम्हाला 'पुष्पा'ची आठवण नक्कीच होईल. टीझरमध्ये पुष्पा सिनेमाची झलक पाहायला मिळते. सिनेमाचं म्युझिक देखील पुष्पा सिनेमाची आठवण करून देते.
वीरलापल्ली नावाच्या एका छोट्या गावापासून टीझरची सुरूवात होते. कोळशाच्या खाणीच्या मधोमध वसलेलं हे गाव आणि या गावातील एका मुलाची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. दारू पिणं या गावाची परंपरा आहे. याच गावात नानी राहतो. या गावात कोण राम आणि कोण रावण हे कोणालाच माहिती नाही. हातात कोयता घेऊन सगळेच एकमेकांचं रक्त पिण्यासाठी तहानलेले दिसत आहेत. त्याचा जबरदस्त एन्ट्री सीन अंगावर शहारा आणतो.
एका सीनमध्ये नानी धावताना दिसतो आणि अखेरच्या शॉटमध्ये कोयत्याने आपला अंगठा कापून ते रक्त माथ्यावर लावतो. चित्रपटाचा टीझर बघता, या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन सीन्स असणार हे नक्की आहे. या चित्रपटातील नानीचा अवतार बघून त्याची तुलना पुष्पाशी केली जात आहे. श्रीकांत ओडेला यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. किर्ती सुरेश, साई कुमार, शाइन टॉम चाको यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
येत्या ३० मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तेलगू भाषेतील हा सिनेमा तामिळ, कन्नड, मल्याळम व हिंदी भाषेतही बघायला मिळणार आहे.