लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही फराह खान कोविड पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 15:36 IST2021-09-01T15:26:00+5:302021-09-01T15:36:37+5:30

नृत्यदिग्दर्शिका फराह खानने कोविड लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही तिला कोरोनाची लागण झाली आहे.

Coronavirus: Farah Khan covid positive even after taking two doses | लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही फराह खान कोविड पॉझिटिव्ह

लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही फराह खान कोविड पॉझिटिव्ह

ठळक मुद्देसोशल मीडियावर होतीये फराह खानची चर्चा

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि दिग्दर्शिका फराह खानला कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे फराहने कोविड लशीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीदेखील तिला कोविडची लागण झाली आहे. याविषयीची माहिती तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दिली आहे. मात्र, फराहला कोविड झाल्यामुळे सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा फराहची चर्चा रंगली आहे. 

"मी काळा टिका लावला नाही त्यामुळे हे झालं याचं मला आश्चर्य वाटतंय. मी कोरोना लशीचे दोन डोस घेतले आहे. तसंच कोविड लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींच्याच जास्त संपर्कात होते. मात्र, तरीदेखील मी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सध्याच्या काळात मी ज्या व्यक्तींच्या संपर्कात आले आहे, त्यांना या पोस्टच्या माध्यमातून माहिती देत आहे. परंतु, ज्यांना कळवलं नाही त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्या. आशा आहे या लवकरच मी बरी होईन", असं फराहने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत कलाविश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यात मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करीम मोरानी या सारख्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, फराहने कोविड लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही तिला पुन्हा कोविड झाल्यामुळे कलाविश्वात पुन्हा एकदा याविषयी चर्चा रंगू लागली आहे.

Web Title: Coronavirus: Farah Khan covid positive even after taking two doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.