'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:23 IST2025-05-09T12:22:39+5:302025-05-09T12:23:25+5:30

Shaina Qureshi Bollywood Connection: पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती सांगणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी चर्चेत आल्या आहेत.

colonel sofiya qureshi sister shaina qureshi has bollywood connection | 'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल

'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) द्वारे भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मादेखील करण्यात आला. त्यानंतर काल पाकिस्तानने भारतीय सीमेवर हल्ले केले, परंतु हे हल्ले भारतीय जवानांनी हाणून पाडले. गेल्या दोन दिवसांपासून परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेद्वारे या प्रकरणाची अपडेट देत आहे. यामध्ये भारतीय सैन्याचे नेतृत्व कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंग करत आहेत. भारतीय सैन्य पाकिस्तानला कसे प्रत्युत्तर देण्यात गुंतले आहेत, याचे अपडेट प्रत्येक मिनिटाला कर्नल सोफिया कुरेशी शेअर करत आहेत.

तुम्हाला माहित्येय का, की कर्नल सोफिया कुरेशी भारतीय सैन्यात सामील होण्यापूर्वी पीएचडी स्कॉलर होत्या. हो, त्या पीएचडी करत होत्या आणि त्यांनी पीएचडी भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी सोडली. कर्नल सोफिया कुरेशी यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर त्या पीएचडी करत होत्या, पण यादरम्यान भारत सरकारने सैन्यात उच्च पदांवर महिलांसाठी भरती जारी केली, म्हणून सोफियायांनी त्यांचा पीएचडीचा अभ्यास मध्येच सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि सैन्यात सामील झाल्या. सोफिया मल्टीनॅशनल लष्करी सरावांचे नेतृत्व करणाऱ्या एक महिला अधिकारी होत्या.

कोण आहे सोफिया कुरेशी यांची बहीण?
ऑपरेशन सिंदूरबद्दल प्रत्येक माहिती दिल्यानंतर, कर्नल सोफिया कुरेशी प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत आणि लोक त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. सोफिया हिंदीमध्ये सैन्याच्या कारवाईबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देताना दिसल्या. फार कमी लोकांना माहित आहे की, सोफिया यांच्या बहिणीचा बॉलिवूड म्हणजेच हिंदी सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं नाव शायना कुरेशी आहे आणि त्या सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्या रुपेरी पडद्यावर दिसत नाहीत, त्या अभिनेत्री नसून पडद्यामागची बरीच काम करतात. खरंतर, शायना यांचे मुंबईत एक प्रॉडक्शन हाऊस आहे, जिथे अनेक चित्रपट आणि जाहिरात चित्रपट बनवले जातात.

Web Title: colonel sofiya qureshi sister shaina qureshi has bollywood connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.