बोल्ड सीन्सच्या नावाखाली भलतीच अपेक्षा; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:56 IST2026-02-09T12:53:06+5:302026-02-09T12:56:11+5:30
"ही पुरुषप्रधान इंडस्ट्री, त्यामुळे...", बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्याची होतेय चर्चा

बोल्ड सीन्सच्या नावाखाली भलतीच अपेक्षा; लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाली...
chitrangada singh : हिंदी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे चित्रांगदा सिंह. तिने आत्तापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या चित्रांगदा तिचा आगामी बॅटल ऑफ गलवान चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. याच दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्रीच्या तिच्या करिअरविषयी सांगितलं आहे.
अलिकडेच पिपिंग मुनला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिचं वैयक्तिक आयुष्य आणि संघर्षकाळावर भाष्य केलं आहे. चित्रांगदाने तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेकब बिग बजेट प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. मात्र, काही काळ ती इंडस्ट्रीत दिसेनाशी झाली होती. जवळपास ७ वर्ष तिने ब्रेक घेतला होता. दरम्यान, या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, जर एखादा अभिनेता फार काळ चित्रपटांमध्ये दिसला नाहीतर याचा त्याच्या कामावर काहीच परिणाम होत नाही. मात्र, महिला कलाकारांच्या बाबतीत हे उलट असतं. यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, खरं सांगायचं झालं तर मला असं काही वाटत नाही.मी तर बरीच वर्षे इंडस्ट्रीत सक्रिय नव्हते. पुन्हा कमबॅक केलं आणि काम केलं आणि त्यानंतर परत ब्रेक घेतला.कारण त्यावेळी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी सुरू होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी मी माघार घ्यायची आणि कामामध्ये माझं लक्ष लागत नव्हतं.
त्यानंतर चित्रांगदा म्हणाली," कारण त्यावेळी मी माझ्या कुटुंबाला वेळ देत होते. म्हणूनच बऱ्याचदा लोकांना वाटायचं की मी विवाहित आहे, मी आता काम करेन की नाही,असं सगळं चालू होतं. पण, त्यातही चांगली कामे माझ्याकडे आली. ही इंडस्ट्री पुरुषप्रधान इंडस्ट्री आहे. त्या तुलनेत महिलाचं करिअर फार काळ टिकत नाही. पण, इंडस्ट्रीने मला स्विकारलं, काम दिलं. आहे आणि माझ्या कामाचं कौतुकही झालं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे,माझे चाहते मला विसरले नाहीत."
बोल्ड भूमिकांमुळे काम करणं थांबवलेलं...
दरम्यान, मुलाखतीत चित्रांगदाने एक धक्कादायक खुलासा केला. यावेळी अभिनेत्रीने म्हटलं, तिने काही चित्रपट यासाठी नाकारले कारण ‘बोल्ड’ सीन्सच्या नावाखाली तिच्याकडून दुसऱ्याच गोष्टींची अपेक्षा केली जात होती. त्याबद्दल बोलताना चित्रांगदा म्हणाली,"बऱ्याचदा पटकथेमध्ये जास्त जोर हा व्यक्तिरेखेपेक्षा दिसण्यावर आणि ग्लॅमरवर दिला जातो. जे खरंतर चुकीचं आहे. मुळात चित्रपटात बोल्डनेस दाखवणं ही समस्या नाही. पण, कथा आणि भूमिकेची गरज असेल तरच तिथे बोल्डनेस दाखवणं योग्य आहे." असं स्पष्ट मत अभिनेत्रीने मुलाखतीत व्यक्त केलं.