चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:14 IST2025-10-22T13:09:12+5:302025-10-22T13:14:01+5:30
चित्रांगदा सलमान खानसोबत आगामी 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणार आहे.

चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
सगळीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच अभिनेत्री चित्रांगदा सिंह मात्र रुग्णालयात दाखल झाली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनेच ही माहिती दिली आहे. चित्रांगदा सलमान खानसोबत आगामी 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणार आहे. त्याआधीच तिला नक्की झालंय काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चित्रांगदा लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना चाहते करत आहेत.
चित्रांगदा सिंहने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर रुग्णालयातील बेडवर असलेला स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या हाताला ड्रिप लावलेली आहे. तिने लिहिले, 'लवकरच मी सश्यासारखी धावायला लागेन'.
चित्रांगदाने तिला नक्की झालंय काय हे मात्र सांगितलेलं नाही. तिच्या प्रकृतीसाठी चाहते आता प्रार्थना करत आहेत. चित्रांगदा नुकतीच 'हाऊसफुल ५'मध्ये दिसली. तर आता तिला थेट सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. सलमान आणि चित्रांगदा ही फ्रेश जोडी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. या सिनेमाबद्दल बोलताना चित्रांगदा म्हणालेली, "ही धैर्य आणि साहसाची कहाणी आहे. मी स्वत: आर्मी कुटुंबातून आली असल्याने या युद्धाबद्दल आमच्याही घरात चर्चा झाली होती हे मला लक्षात आहे. म्हणून या सिनेमाचा भाग असणं माझ्यासाठी वैयक्तिकरित्याही खूप आनंदाची गोष्ट आहे."