'चीनी कम' मधली 'ही' चिमुकली अडकली लग्नबंधनात, सोशल मीडियावर शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 16:05 IST2023-12-28T16:01:38+5:302023-12-28T16:05:52+5:30
लहानशा स्वीनीला आता नवरीच्या रुपात पाहून चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

'चीनी कम' मधली 'ही' चिमुकली अडकली लग्नबंधनात, सोशल मीडियावर शेअर केले Photos
यंदा सगळीकडेच लग्नकार्याला ऊत आला होता. २०२३ या वर्षात अनेक जण लग्नबंधनात अडकले. आता वर्षाच्या शेवटी आणखी एक अभिनेत्री विवाहबद्ध झाली आहे. 2007 साली अमिताभ बच्चन आणि तबू यांचा 'चीनी कम' (Cheeni Kum) हा सिनेमा आला होता. या सिनेमातील बालकलाकार स्विनी खरा (Swini Khara) आठवत असेलच. ती चिमुकली लग्नबंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
स्वीनी खराने आपल्या लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली. तिने लग्नातील खास क्षणांचे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. मनासारखा जोडीदार मिळाल्याने खूप खूश असल्याचं तिने लिहिलं आहे. गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात स्वीनी खूपच सुंदर दिसत आहे. तर पती उर्विशने फिकट पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे.
स्वीनीला बालवयातच 'चीनी कम'मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती.यानंतर ती 'बा, बहू और बेबी' मध्येही दिसली. शिवाय 2016 साली आलेल्या सुपरहिट 'एम एस धोनी' सिनेमातही तिने भूमिका साकारली होती. स्वीनी बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरुन गायब होती. आता तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला आहे. अचानक अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो पाहताच चाहत्यांनी अभिनेत्याचा वर्षाव केलाय.