बालपणी फारच क्यूट दिसत होती बॉलिवूडची 'ही' टॉपची अभिनेत्री, ओळखलं का तुम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 15:13 IST2021-08-06T15:12:15+5:302021-08-06T15:13:10+5:30

दीपिकाने शेअर केलेला तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीपिकाचा हा व्हिडीओ तिच्या फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे.

This childhood photo of Deepika Padukone went viral on internet after shared | बालपणी फारच क्यूट दिसत होती बॉलिवूडची 'ही' टॉपची अभिनेत्री, ओळखलं का तुम्ही?

बालपणी फारच क्यूट दिसत होती बॉलिवूडची 'ही' टॉपची अभिनेत्री, ओळखलं का तुम्ही?

बॉलिवूड कलाकार त्यांचे बालपणीचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. बॉलिवूडची (Bollywood Actress) अभिनेत्री दीपिका पादुकोणही (Deepika Padukone) त्या कलाकारांपैकी एक आहे. जी नेहमीच तिचे बालपणीचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करतात. हे फोटो शेअर करत ती तिच्या बालपणीच्या (Deepika Childhood Photo) आठवणी ताज्या करते. पुन्हा एकदा दीपिकाने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या तिचे बालपणीचे फोटो आहेत.

दीपिकाने शेअर केलेला तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीपिकाचा हा व्हिडीओ तिच्या फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे. काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

दरम्यान, दीपिका लवकरच साउथचा सुपरस्टार प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं शूटींग सुरू झालं असून याची माहिती प्रभासने एका पोस्टमधून दिली आहे. मात्र., सिनेमाचं टायटल अजून रिव्हील करण्यात आलेलं नाही. 

या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक नाग अश्वीन करणार आहे आणि वैजयंती मुव्हीज या सिनेमाची निर्मिती करत आहे. प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्या या सिनेमासाठी रामोजी फिल्मसिटीमध्ये भव्य सेट उभारण्यात आला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या दीपिका शाहरूख खानच्या 'पठाण' सिनेमाचं शूटींग करत आहे. त्यासोबतच दीपिका आणखीही काही सिनेमांमध्ये दिसणार आहे. ती महाभारत, ८३, आणि फायटर सिनेमात दिसणार आहे.
 

Web Title: This childhood photo of Deepika Padukone went viral on internet after shared