'छावा'नंतर विकी कौशलचे स्टार सातवे आसमानपर, हाती लागला आणखी एक बिग बजेट चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:27 IST2025-01-30T16:27:03+5:302025-01-30T16:27:24+5:30
विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच आता एक मोठं अपडेट समोर आलं आहे.

'छावा'नंतर विकी कौशलचे स्टार सातवे आसमानपर, हाती लागला आणखी एक बिग बजेट चित्रपट?
Vicky Kaushal: विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे दिग्दर्शक कबीर खान प्रयागराजमध्ये पवित्र संगमस्नान केल्याने चर्चेत आहे. अशातच आता दिग्दर्शक कबीर खान अभिनेता विकी कौशलसोबत एक चित्रपट बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विकी कौशल हा दिग्दर्शक कबीर खानसोबतत काम करणार असल्याची चर्चा आहे. हे दोन दिग्गज एकत्र येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी कतरीना कैफसोबत काम केलेला कबीर आता तिचा नवरा विकीसोबत काम करणार आहे. विकी आणि कबीर यांनी नेहमीच एकमेकांच्या कामाचे कौतुक केले असले तरी एकत्र काम केलेले नाही. आता हे दोघेही एका अनटायटल चित्रपटासाठी एकत्र आल्याचे समजतंय.
याबाबतची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. अद्याप या चित्रपटाचा करार झालेला नसला तरी बऱ्याच गोष्टी ठरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नुकतीच कबीरने अप्लॅाज एन्टरटेन्मेंटसोबत दोन चित्रपटांची घोषणा केली आहे. त्यापैकीच एकामध्ये विकी दिसणार का, हेसुद्धा गुलदस्त्यातच आहे. कबीर आणि कतरीना यांची खूप चांगली मैत्री असल्याने या चित्रपटात विकी-कतरीना एकत्र येतील का, याचीही चर्चा आहे.