Chhaava Twitter Review: विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 14:00 IST2025-02-14T13:59:45+5:302025-02-14T14:00:25+5:30

गेल्या वर्षभरापासून ज्या सिनेमाची हवा आहे तो 'छावा' सिनेमा आज थिएटरमध्ये रिलीज झालाय. सिनेमा पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत (chhaava, vicky kaushal)

Chhaava Twitter Review audience reaction after watch chhaava movie vicky kaushal akshaye khanna | Chhaava Twitter Review: विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

Chhaava Twitter Review: विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या प्रचंड चर्चा आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. अखेर 'छावा' थिएटरमध्ये रिलीज झाला. विकी कौशलने (vicky kaushal) सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (akshaye khanna) पाहायला मिळतोय. 'छावा' सिनेमा रिलीज होताच प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. विकी कौशलच्या १० वर्षातील करिअरमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून 'छावा' सिनेमाला ओळखलं जातंय. जाणून घ्या प्रेक्षक-समीक्षकांच्या प्रतिक्रिया

'छावा' पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

समीक्षक तरण आदर्श यांनी X वर रिव्ह्यू पब्लिश करुन 'छावा' सिनेमाला साडेचार स्टार्स दिले आहेत. "भावना, इतिहास, पराक्रम या सर्व गोष्टींना छावामध्ये चांगल्या पद्धतीने गुंफण्यात आलंय. लक्ष्मण उतेकर यांनी उत्कृष्ट स्टोरीटेलर म्हणून त्यांची जबाबदारी निभावली आहे. छावाने छत्रपती संभाजी महाराजांना उत्कृष्ट पद्धतीने मानवंदना दिली आहे. रश्मिका, विकी दोघांनी सुंदर अभिनय केलाय. अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेत केलेला अभिनय प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील."



एका युजरने 'छावा'चे पोस्टर्स शेअर करुन लिहिलंय की,  "विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अक्षरशः जगलाय. रश्मिका मंदानाने नेहमीप्रमाणे सहजसुंदर अभिनय केलाय. बॅकग्राऊंड म्युझिकही मस्त आहे. गाणी आणि संगीत उत्कृष्ट. थिएटरमध्ये नक्कीच बघावा असा छावा."

आणखी एका युजरने X वर लिहिलंय की, "छावा हा एक उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य अत्यंत हुशारीने रुपेरी पडद्यावर दाखवलं आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत भावनात्मत खोली दर्शवली आहे. अक्षय खन्नाचं औरंगजेबाच्या भूमिकेत झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहणं हा एक सुखद अनुभव. देहबोली, संवादफेकीवर अक्षयचं असलेलं प्रभुत्व वाखाणण्याजोगं आहे. युद्धाचे प्रसंग आपल्या काळजाचा ठोका चुकवतात."



एका X युजरने लिहिलंय की, "खरा ऐतिहासिक धडा. विकी कौशलचा उत्कृष्ट परफॉर्मन्स. लक्ष्मण उतेकर यांचं जबरदस्त दिग्दर्शन. सिनेमाच्या व्याख्याला नव्याने अधोरेखित करणारा हा छावा. आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी कलाकृती. माझ्याकडून पाच स्टार." अशाप्रकारे X युजर्सने 'छावा' सिनेमा पाहून त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केल्यात. सर्वांना 'छावा' आवडलेला दिसतोय. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अनुभवण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दी करत आहेत.

Web Title: Chhaava Twitter Review audience reaction after watch chhaava movie vicky kaushal akshaye khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.