'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटीवर बघायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:41 IST2025-02-15T16:40:55+5:302025-02-15T16:41:31+5:30
विकी कौशलच्या सध्या गाजत असलेला 'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार याविषयी माहिती समोर आली आहे (vicky kaushal, chhaava)

'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटीवर बघायला मिळणार? जाणून घ्या एका क्लिकवर
'छावा' सिनेमाची (chhaava) चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात विकी कौशलने (vicky kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना (rashmika mandanna) झळकत आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना (akshaye khanna) लक्षवेधी ठरतोय. 'छावा' सिनेमाची खूप हवा आहे. सिनेमा रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी सिनेमाने ३० कोटींहून अधिकचा व्यवसाय केलाय. अशातच 'छावा'च्या ओटीटी रिलीजबद्दलही माहिती समोर आलीय. जाणून घ्या त्याचविषयी
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार छावा?
'छावा' सिनेमा कोणत्या ओटीटीवर बघायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. त्याचं उत्तर आहे नेटफ्लिक्स. हो तुम्ही बरोबर ऐकताय. 'छावा' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ऑनलाईन स्ट्रीमिंग पार्टनर म्हणून नेटफ्लिक्सने 'छावा'सोबत करार केला आहे. 'छावा' ओटीटीवर रिलीज व्हायला अजून बरेच दिवस लागतील. कारण थिएटरमध्ये 'छावा' हाउसफुल्ल गर्दीत सुरु आहे. त्यामुळे 'छावा' ओटीटीवर रिलीज व्हायला अजून चार-पाच महिन्यांचा कालावधी लागेल.
'छावा' थिएटरमध्येच पाहा
ज्यांनी 'छावा' थिएटरमध्ये बघितला आहे त्यांच्यासाठी सिनेमाचा अनुभव अविस्मरणीय आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक 'छावा' थिएटरमध्येच बघण्याचं आवाहन करत आहेत. 'छावा' ओटीटीवर जेव्हा येईल तेव्हा येईल. पण सिनेमाचा थिएटरमधील अनुभव कोणी चुकवू नये असाच आहे. 'छावा'बद्दल सांगायचं तर विकी कौशलने सिनेमात छत्रपती शंभूराजेंची भूमिका साकारली आहे. याशिवाय मुख्य कलाकारांसोबत संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर हे मराठी कलाकारही त्यांच्या भूमिकेत छाप पाडत आहेत.