"या भूमीचा त्याग पाहून मी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणारा अभिनेता छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:53 IST2025-02-19T13:53:25+5:302025-02-19T13:53:48+5:30
'छावा' सिनेमात कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन आलेले भारावणारा अनुभव सांगितला आहे (chhaava)

"या भूमीचा त्याग पाहून मी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणारा अभिनेता छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक
'छावा' सिनेमा (chhaava movie) नुकताच रिलीज झालाय. या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा आहे. लक्ष्मण उतेकर (laxman utekar) यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय. विकी कौशलने सिनेमात साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालंय. याशिवाय सिनेमात कवी कलश यांची भूमिका अभिनेता विनीत कुमार सिंगने साकारली. विनीतच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. विनीतने (vineet kumar singh) छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ तुळापूर येथे भेट दिली. त्यानिमित्ताने विनीतने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
विनीत कुमार सिंगने तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानिमित्त विनीत पोस्ट करुन म्हणाला की, "छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने, माझ्या प्रवासातील एका आध्यात्मिक आणि आयुष्य बदलणाऱ्या क्षणाची मला आठवण येते. छावा चित्रपटातील कवी कलशच्या भूमिकेचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी मी तुळापूरला भेट दिली. अत्यंत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. ही पवित्र भूमी छत्रपती संभाजी महाराजजी आणि कवी कलशजी यांच्या समाधीस्थळांचे घर आहे. इथूनच भगवान शिवाच्या मंदिराकडे जाणारा मार्ग आहे."
"कवी कलश यांच्या भगव्या रंगाच्या समाधीस्थळावर मी बराच वेळ चिंतनात घालवला. आदरांजली वाहिली आणि त्या ठिकाणाची ऊर्जा आत्मसात केली. मी भगवान शंकराच्या मंदिरालाही भेट दिली. संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर शांतपणे उभा राहिलो, या भूमीचा इतिहास आणि त्याग पाहून मी खूप प्रभावित झालो. तिथे उभे राहून, मला शक्तीची एक लाट जाणवली, ज्यामुळे मला कवी कलशच्या भूमिकेशी पूर्ण प्रामाणिक राहण्यास मदत झाली. ही भेट केवळ आशीर्वाद मिळविण्यासाठी नाही. तर त्यापेक्षा जास्त होती. कवी कलश यांच्या अंतरंग संपूर्ण सिनेमाभर मला दाखवणारा एक प्रवास होता."
"आज, आपण छत्रपती शिवाजी महाराजजींचा सन्मान करत असताना, ही कथा जिवंत करण्याची आणि या महान योद्ध्यांच्या वारशाला आदरांजली वाहण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खूप कृतज्ञता वाटते." असं लिहून विनीतने शेवटी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.