'छावा'मधून डिलीट झालेला आणखी एक सीन समोर, नेटकरी म्हणतात- हा प्रसंग सिनेमात पाहिजे होता!

By देवेंद्र जाधव | Updated: August 24, 2025 13:55 IST2025-08-24T13:52:57+5:302025-08-24T13:55:55+5:30

'छावा' सिनेमातून डिलीट झालेला दुसरा सीन समोर आला आहे. हा सीन पाहताच नेटकऱ्यांनी या सीनला पसंती दिली आहे

Chhaava movie deleted scene diffrent vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | 'छावा'मधून डिलीट झालेला आणखी एक सीन समोर, नेटकरी म्हणतात- हा प्रसंग सिनेमात पाहिजे होता!

'छावा'मधून डिलीट झालेला आणखी एक सीन समोर, नेटकरी म्हणतात- हा प्रसंग सिनेमात पाहिजे होता!

'छावा' सिनेमा जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा सिनेमातून काही सीन्स वगळण्यात आले होते. सिनेमा पाहताना मात्र जाणवलं नाही पण आता 'छावा' सिनेमा काही दिवसांपूर्वी टीव्हीवर दाखवण्यात आला. तेव्हा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा' सिनेमातील डिलीट केलेले काही सीन्स टीव्हीवर दाखवले. त्यामुळे प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. याशिवाय सर्वांना मनोरंजनाची पर्वणी मिळाली. 'छावा' सिनेमातील असाच एक डिलीट झालेला सीन समोर आलाय. जेव्हा शंभूराजे ओरंगजेबाला तोडीस तोड उत्तर देतात.

'छावा'मधील डिलीट झालेला आणखी एक सीन

'छावा'मधून डिलीट झालेला आणखी एक सीन विकी कौशलच्या एका फॅन पेजने शेअर केला आहे. यात छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब एकमेकांसमोर असतात. या प्रसंगात दिसतं की, शंभूराजे त्यांचं हिंदुस्थानाबद्दल किती प्रेम आहे, असं औरंगजेबाला सांगतात. "राजा तो असतो जो संपूर्ण देश स्वतःच्या मुठीत ठेवतो", असं औरंगजेब शंभूराजेंना समजावतात. "मला माझा हिंद प्रांत माझ्या मुठीत ठेवायचा नाहीये तर स्वतंत्र बघायचाय", असं प्रतिउत्तर देऊन शंभूराजे औरंगजेबाची बोलती बंद करतात. हा जबरदस्त सीन पाहून नेटकऱ्यांनी या सीनला पसंती दिली आहे.


'छावा'मधील डिलीट झालेल्या या सीनमध्ये अक्षय खन्ना आणि विकी कौशल यांचा दमदार अभिनय बघायला मिळतोय. . 'छावा' सिनेमाबद्दल सांगायचं तर सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची, अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. याशिवाय सिनेमात संतोष जुवेकर, आस्ताद काळे, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये सारखे मराठी कलाकारही झळकले होते.

Web Title: Chhaava movie deleted scene diffrent vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.