'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:16 IST2025-04-07T11:15:48+5:302025-04-07T11:16:42+5:30

'Chhaava' Movie : अभिनेता विकी कौशलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा' थिएटरमध्ये एकापाठोपाठ एक मोठे रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवसांचा अप्रतिम प्रवास पूर्ण केला आहे आणि आता पुन्हा रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे.

'Chhaava' Movie breaks 10 box office records on day 52, Vicky Kaushal's film creates history | 'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास

'छावा'ने ५२व्या दिवशी तोडले १० बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, विकी कौशलच्या सिनेमाने रचला इतिहास

अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा' (Chhaava Movie) थिएटरमध्ये एकापाठोपाठ एक मोठे रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये ५० दिवसांचा अप्रतिम प्रवास पूर्ण केला आहे आणि आता पुन्हा रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. सलमान खानचा 'सिकंदर' रिलीज झालेला असताना 'छावा'चे चाहते अजूनही सिनेमागृहांकडे वळत आहेत आणि त्यामुळेच सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम आहे. चला तर मग जाणून घेऊया चित्रपटाने रविवारी म्हणजेच ५२ व्या दिवशी किती कमाई केली आणि चित्रपटाचे एकूण कलेक्शन काय आहे.

बॉक्स ऑफिसवरील अधिकृत आकडेवारीनुसार, छावाने हिंदी आणि तेलगूसह ७ आठवड्यात ६०९.८७ कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये तेलगू व्हर्जनची कमाई फक्त ३ आठवड्यांची आहे कारण छावा हिंदी व्हर्जन रिलीज झाल्यानंतर ४ आठवड्यांनंतर तेलुगूमध्ये रिलीज झाला होता. ५०व्या आणि ५१ व्या दिवशी चित्रपटाने ५५ लाख आणि ९० लाखांची कमाई केली. म्हणजेच कालपर्यंत या चित्रपटाने ६११.३२ कोटींची कमाई केली होती. आता रविवारच्या कमाईवर नजर टाकली तर सकाळी १०.३५ पर्यंत १.३० लाख रुपयांची कमाई झाली आहे आणि चित्रपटाची एकूण कमाई ६१२.६२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.

'छावा'ने १० मोठे विक्रम काढले मोडीत 
'छावा'ने रिलीजच्या ५२व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांना मागे टाकले आहे. यापैकी काही चित्रपटांची ८व्या आठवड्यातील एकूण कमाई छावाच्या आजच्या कमाईपेक्षा कमी आहे. चला तर मग जाणून घेऊयात छावा चित्रपटाने कोणते रेकॉर्ड मोडले आहेत.

गदर २ - ५५ लाख (८व्या आठवड्याची पूर्ण कमाई)
आरआरआर - ८० लाख (८व्या आठवड्यात हिंदी आवृत्तीतून संपूर्ण कमाई)
अ‍ॅनिमल - २० लाख (५२ व्या दिवशी कमाई)
जवान - १३ लाख (५२ व्या दिवशी कमाई)
पुष्पा २ - ४५ लाख (५२ व्या दिवशी सर्व भाषांमधून कमाई)
स्त्री २ - ९० लाख (५२ व्या दिवशी कमाई)
पठाण - २० लाख (५२ व्या दिवशी कमाई)
कल्कि - ६ लाख (५२ व्या दिवशी सर्व भाषांमधून कमाई)
बाहुबली २ - १.४ कोटी ( ८व्या आठवड्यातील हिंदी कमाई, ८व्या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसात छावाने मागे टाकले आहे.)
२.० - ३ लाख (८ व्या आठवड्याची एकूण कमाई)

'छावा'बद्दल
संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. अक्षय खन्ना, डायना पेंटी, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट बनवण्यासाठी १३० कोटी रुपये खर्च आला आहे.

Web Title: 'Chhaava' Movie breaks 10 box office records on day 52, Vicky Kaushal's film creates history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.