Chhaava Movie: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, ८ दिवसांचं कलेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:11 IST2025-02-22T11:10:44+5:302025-02-22T11:11:11+5:30

बहुचर्चित आणि बिग बजेट असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

chhaava movie box office collection day 8 vicky kaushal details | Chhaava Movie: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, ८ दिवसांचं कलेक्शन समोर

Chhaava Movie: बॉक्स ऑफिसवर 'छावा' सुसाट, ८ दिवसांचं कलेक्शन समोर

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा'छावा' हा ऐतिहासिक सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. बहुचर्चित आणि बिग बजेट असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचं  बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी फोडली आहे. 'छावा'ने बॉक्स ऑफिसचं अख्ख मार्केटच खाऊन टाकलं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात छावाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. विकी कौशलचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. 'छावा'ने  प्रदर्शनाच्या दिवशीच तब्बल ३१ कोटींचा गल्ला जमवला होता. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात २१९ कोटी कमावले. तर आठव्या दिवशी छावाने २३ कोटींची कमाई केली आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफसिवर २४२.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

छावा सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई भोसलेंच्या भूमिकेत आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून सिनेमात संतोष जुवेकर, शुंभकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये ही मराठी कलाकारांची फौज आहे. 

Web Title: chhaava movie box office collection day 8 vicky kaushal details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.