'चेन कुली की मेन कुली' मधील 'तो' क्रिकेटप्रेमी बालकलाकार आठवतोय? आता दिसतो खूप हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:43 IST2025-06-20T17:19:45+5:302025-06-20T17:43:37+5:30

'चेन कुली की मेन कुली' मधील 'तो' क्रिकेटप्रेमी बालकलाकार आठवतोय? १८ वर्षांनंतर इतका बदलला लूक

chain kulii ki main kulii fame zain khan changed in 18 years he looks very handsome now | 'चेन कुली की मेन कुली' मधील 'तो' क्रिकेटप्रेमी बालकलाकार आठवतोय? आता दिसतो खूप हॅण्डसम

'चेन कुली की मेन कुली' मधील 'तो' क्रिकेटप्रेमी बालकलाकार आठवतोय? आता दिसतो खूप हॅण्डसम

Zain Khan : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये बालकलाकारांच्या रुपातही काही चेहरे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या बालकलाकारांनी आपल्या निरागस स्वभाव आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. 
असेच काही चेहरे त्यांनी साकारलेल्या बालकलाकारांच्या भूमिकांसाठी चांगलेलच ओळखले जातात. त्यापैकीच एक चेहरा म्हणजे चैन कुली की मैन कुली  या चित्रपटातील क्रिकेटप्रेमी छोटा करण. ही भूमिका बालकलाकार जैन खानने उत्तमरित्या साकारली होती. 

एक मुलगा जो अनाथ असूनही क्रिकेटच्या क्षेत्रात मोठं नाव कमावण्याचं स्वप्न उरासी बाळगतो. जैनचा निरागसपणा, आत्मविश्वास आणि सहज सुंदर अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडला. या चित्रपटात त्याने अभिनेता राहुल बोससोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याचबरोबर कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू देखील चित्रपटात पाहायला मिळाले. हा चित्रपट विशेषतः क्रिकेट प्रेमींसाठी भावनिक अनुभव देणारा ठरला. 

'चेन कुली की मेन कुली' नंतर, जैनने आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलं.  'परिणीता' मध्ये तरुण सैफ अली खानची भूमिका साकारली होती, शाहिद कपूरचा 'चान्स पे डान्स' आणि 'माय वाइफ्स मर्डर' यांचा समावेश आहे.परंतु, जैन खानने अभिनय क्षेत्राचा करिअर म्हणून विचार न करता हळूहळू त्याने या क्षेत्रापासून अंतर बनवलं आणि तो इंडस्ट्रीतून गायब झाला. 

Web Title: chain kulii ki main kulii fame zain khan changed in 18 years he looks very handsome now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.