Deepika Padukone Cannes 2022 : इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना ‘वेदना’ असह्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 14:48 IST2022-05-18T14:46:02+5:302022-05-18T14:48:01+5:30
Cannes 2022 : बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर उतरणार आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा होणार नाही, हे शक्यच नाही.

Deepika Padukone Cannes 2022 : इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना ‘वेदना’ असह्य
Cannes Film Festival 2022 : बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर उतरणार आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा होणार नाही, हे शक्यच नाही. कान्स सोहळ्याच्या पहिल्या दिवशी दीपिका ब्लॅक-गोल्ड कलरच्या साडीत रेड कार्पेटवर उतरली आणि तिला पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. दीपिकाने यंदा कान्स फेस्टिवलच्या ज्युरींसोबत रेड कार्पेट वॉक केला. विदेशी भूमीवरचा तिचा देशी लुक पाहून चाहत्यांनी मस्तानीचं जोरदार कौतुक केलं. पण या लुकमधील एक गोष्ट मात्र चाहत्यांना खटकली. होय, दीपिकाचा कान्समधील लुक पाहून चाहत्यांनी तिच्या कानांची दया आली. होय, सोशल मीडियावर तर चक्क #justicefordeepikasearlobes ट्रेंड झालं. यावरून दीपिकाला काही जणांनी ट्रोलही केलं. फॅशनसाठी स्वत:ला इतकं टॉर्चर का करायचं? असा सवाल अनेक चाहत्यांनी उपस्थित केला.
होय, दीपिकाने कान्सच्या पहिल्या दिवशी सब्यसाचीने डिझाईन केलेली ब्लॅक-गोल्ड सीक्वेन्स साडी नेसली होती. फंकी हेअरबन, त्यावर गोल्डन हेडबँड, ड्रामेटिक आयलाईनर, न्यूड लिप्स आणि हेवी ईअररिंग्स असा तिचा लुक होता. यातील दीपिकाचे जड लोंबणारे कानातले चाहत्यांना खटकले. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात.
दीपिकाने सब्यसाची ज्वेलरी बंगाल रॉयल कलेक्शनमधील chandelier ईअररिंग्स घातले होते. गोल्डन कलरच्या या ईअररिंग्सवरून नेटकऱ्यांनी दीपिकाची मजा घेतली. ‘दीपिकाचे ear lobes (कानाच्या पाळी) मदतीसाठी ओरडत आहेत,’अशी कमेंट एका चाहत्याने केली. ‘बिचारे कान’, अशी कमेंट एकाने केली. लोक फॅशनच्या नावावर स्वत:वर इतके अत्याचार का करतात, अशी कमेंट अन्य एका युजरने केली. यावर कळस म्हणजे, एका युजरने चक्क #justicefordeepikasearlobes ट्रेंड करायला सुरूवात केली. अनेकांनी दीपिकाच्या आयलाईनरवरूनही तिची खिल्ली उडवली.