Cannes 2019 : दीपिका पादुकोणचा दुसऱ्या दिवशी दिसला क्लासी लूक, नवरा रणवीर सिंगने केली अशी कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 13:23 IST2019-05-17T13:22:46+5:302019-05-17T13:23:19+5:30
दीपिका पादुकोण दुसऱ्या दिवशीच्या लूकमध्ये खूप ग्लॅमरस दिसत होती.

Cannes 2019 : दीपिका पादुकोणचा दुसऱ्या दिवशी दिसला क्लासी लूक, नवरा रणवीर सिंगने केली अशी कमेंट
सध्या सगळीकडे कान्स फिल्म फेस्टिव्हलचीच चर्चा रंगली आहे. या फेस्टिव्हलमधील सेलिब्रेटींचे लूक पाहणे कमालीचे ठरते आहे. या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी आपल्या लूकने सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. त्यात दीपिका पादुकोण खूपच ग्लॅमरस दिसत होती. आता तिने या फेस्टिव्हलमधील दुसरा लूक शेअर केला ज्यात ती खूप वेगळीच दिसते आहे. त्यात ती खूप क्लासिक दिसते आहे. या फोटोत ती ब्लू अँड व्हाईट रंगाच्या पॅण्टसूटमध्ये पहायला मिळते आहे.
दीपिकाने कान्समधील दुसरा लूक शेअर केल्यानंतर त्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला. तर तिचा नवरा अभिनेता रणवीर सिंगने तर तिचे कौतूक करीत किलिंग अशी कमेंट दिली आहे. दीपिकाने ब्लू अँड व्हाईट रंगाच्या पँट सूटसोबत पिवळ्या रंगाचे डँगलर्स कानात घातले आहेत काळ्या रंगाचा चश्मा आणि ऑरेंज रंगाचे शूज आऊटफिटवर खुलून दिसत आहेत.
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ साठी दीपिकाने पीटर डूंडासने डिझाईन केलेल्या अफव्हाइट रंगाच्या डीप नेक गाऊनची निवड केली. तिच्या या ड्रेसचे मुख्य आकर्षण होते, ते त्यावरचा ब्लॅक बो.
या ग्लॅमरस ड्रेससोबत मोठे डायमंड इअरिंग्स. शिमरी ब्रेसलेट, पिंक लिप्स, सुंदर मेकअप आणि हाय पोनीटेल या सर्वांनी तिचा लुक चांगलाच उठून दिसत होता.
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2019 पूर्वी दीपिकाने मेट गालाच्या पिंक कार्पेटवर हजेरी लावली होती.
तिचा हा लुकही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तिच्या मेट गाला लुकचे सर्वत्र खूप कौतुक झाले होते.
दीपिका सध्या मेघना गुलजारच्या ‘छपाक’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
या सिनेमात ती दिल्लीची अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालची व्यक्तिरेखा साकारते आहे.