'धुरंधर'चं मार्केट खायला 'बॉर्डर २' येतोय! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:40 IST2025-12-12T17:40:15+5:302025-12-12T17:40:43+5:30
'धुरंधर'ला टक्कर द्यायला आता आणखी एक देशभक्तीपर सिनेमा येत आहे. सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी अशी स्टारकास्ट असलेला 'बॉर्डर २' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

'धुरंधर'चं मार्केट खायला 'बॉर्डर २' येतोय! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
सध्या 'धुरंधर' या सिनेमाचीच सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. 'धुरंधर'ने अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. या सिनेमातून पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेराची कहाणी दाखवण्यात आली आहे. पण, 'धुरंधर'ला टक्कर द्यायला आता आणखी एक देशभक्तीपर सिनेमा येत आहे. सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी अशी स्टारकास्ट असलेला 'बॉर्डर २' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
'बॉर्डर २' सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचा युद्धभूमीवरील लूक या पोस्टरमध्ये दिसत आहे. 'बॉर्डर २'चं हे नवीन पोस्टर पाहून अंगावर काटा येत आहे. हे पोस्टर शेअर करत सिनेमाच्या टीझरबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. "विजयी दिवसाचा जल्लोष, १९७१ चा विजय आणि वर्षातील सगळ्यात मोठा टीझर लॉन्च - एक साथ! १६ डिसेंबरला दुपारी १.३० वाजता", असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
'बॉर्डर २' हा १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' सिनेमाचा सीक्वल आहे. हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सिनेमातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. त्यामुळेच 'बॉर्डर २'ची घोषणा झाल्यापासूनच चाहते सिनेमासाठी उत्सुक होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. २३ डिसेंबरला 'बॉर्डर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.