Boney Kapoor : बोनी कपूर सर्वांसमोर हे काय बोलून गेलेत? अक्षय कुमारला लगावला अप्रत्यक्ष टोला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 15:35 IST2022-11-08T15:34:48+5:302022-11-08T15:35:22+5:30
Boney Kapoor's Indirect Dig At Akshay Kumar : बोनी कपूर असं काही बोलून गेलेत की ते ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अनेकांनी बोनी कपूर यांच्या विधानाचा संबंध थेट अक्षय कुमारशी जोडला.

Boney Kapoor : बोनी कपूर सर्वांसमोर हे काय बोलून गेलेत? अक्षय कुमारला लगावला अप्रत्यक्ष टोला?
गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत असणारे निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी अलीकडे लेक जान्हवी कपूरसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ( The Kapil Sharma Show) हजेरी लावली. या शोमध्ये खरं तर बोनी कपूर लेकीच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. पण गप्पांच्या ओघात करिअर, बॉलिवूड, बॉलिवूड स्टार्स याबद्दलही ते बोलले. याचदरम्यान बोनी कपूर असं काही बोलून गेलेत की ते ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अनेकांनी बोनी कपूर यांच्या विधानाचा संबंध थेट अक्षय कुमारशी (Akshay Kumar) जोडला.
काय म्हणाले बोनी कपूर?
इंडस्ट्रीतले काही स्टार्स आपल्या कामाबद्दल प्रामाणिक नाहीत, असं बोनी कपूर म्हणाले. ‘बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना फक्त 25-30 दिवसांत सिनेमा संपवून पूर्ण फी घ्यायची असते. असे स्टार्स आपल्या कामाप्रती प्रामाणिक नसतात आणि याचमुळे चित्रपट चांगला बनत नाही. कारण उत्तम सिनेमा बनवायला वेळ लागतो. मी येथे कोणत्याही अभिनेत्याचं नाव घेत नाहीये. पण अनेक कलाकार आहेत. किती दिवसांचं काम आहे? असं ते आधीच विचारतात. त्यांच्या मर्जीनुसार त्यांना अभिनेत्री, दिग्दर्शक उपलब्ध हवा असतो. मग उत्तम चित्रपट कसा बनणार? प्रेक्षकांनादेखील तो चित्रपट आवडणार नाही, असं बोनी कपूर म्हणाले.
बोनी कपूर यांनी कोणत्याही अभिनेत्याचं नाव घेतलं नाही. अनेकांनी त्यांच्या बोलण्याचा संबंध अक्षय कुमारशी जोडला. अक्षय कुमार 20-30 दिवसांत एक सिनेमा हातावेगळा करतो. इंडस्ट्रीतील सर्वाधिक बिझी स्टार्स म्हणून तो ओळखला जातो. वर्षभरात सर्वाधिक चित्रपट करणारा स्टार अशीही त्याची ओळख आहे.