Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण; झाला होम क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 10:02 IST2021-04-04T09:59:19+5:302021-04-04T10:02:02+5:30
संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं केलं आवाहन

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण; झाला होम क्वारंटाईन
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेते, राजकीय व्यक्ती अशा अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. अक्षय कुमारनं ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्व नियमांचं पालन करून मी आयलोशनमध्ये आहे. मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं असून आवश्यक तो वैद्यकीय सल्ला घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यानी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, तसंच काळजी घ्यावी. मी लवकरच पुन्हा भेटेन," असं ट्वीट अक्षय कुमारनं आपल्या फॅन्ससाठी केलं आहे.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 4, 2021
काही दिवसांपूर्वीच एका चित्रपटाचं शूटिंग झालं पूर्ण
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या अतरंगी रे या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं होतं. अक्षय कुमारनं ट्वीट करत याची माहिती दिली. "अतरंगी रे चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. मी आता आनंद एल राय यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे. माझा सहकलाकार धनुष आणि सारा यांनाही या चित्रपटासाठी शुभेच्छा," असं ट्वीट अक्षय कुमारनं केलं होतं. याशिवाय अक्षयने या चित्रपटाचे लेखक हिमांशू शर्मा आणि संगीतकार ए.आर. रहमान यांचेही आभार मानले होते. सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष स्टारर 'अतरंगी रे' हा २०२१ मधील मोस्टअवेटेड चित्रपट आहे.