"लेखकांनाच पुढे यायचं नाही..." 'सिंघम अगेन'चा लेखक क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला, म्हणाला-" ज्यांनी हे ठरवलंय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:07 IST2024-11-16T15:00:00+5:302024-11-16T15:07:17+5:30
मराठमोळा दिग्दर्शक, लेखक क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) 'सिंघम अगेन' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे.

"लेखकांनाच पुढे यायचं नाही..." 'सिंघम अगेन'चा लेखक क्षितीज पटवर्धन स्पष्टच बोलला, म्हणाला-" ज्यांनी हे ठरवलंय..."
Kshitij Patwardhan: मराठमोळा दिग्दर्शक, लेखक क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) 'सिंघम अगेन' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. आपल्या लेखणीच्या जादूने त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलंय.त्याने लिहलेल्या 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या पटकथेला प्रेक्षकांची दाद मिळते आहे. दरम्यान, क्षितीजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लेखकांविषयी एक भाष्य केलं आहे.
नुकतीच क्षितीज पटवर्धने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. काही लेखकांच्या मते लेखकाला ओळखच दिली जात नाही. सिनेमा लिहल्यानंतर लेखकाला विसरून जातात हे वास्तव इंडस्ट्रीत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल सांगताना क्षितीज पटवर्धन म्हणाला," हो आहे, याचं कारण म्हणजे लेखकांनाच पुढे यायचं नाही. जर ते पुढे आले तर मग सोशल मीडियावर कमेंट केल्या जातात की लेखकच स्वत:चं टिमणं वाजवत असतात. हा प्रत्येकाचा चॉईस आहे. त्यातही एखादा लेखक असं म्हणू शकतो की मला नकोय प्रसिद्धी किंवा मला लोकांमध्ये नाही जायचं".
पुढे त्याने म्हटलं की, "ज्यांनी हे ठरवलंय की मी जे काही काम करतो त्यामुळे मला लोकांनी ओळखावं. त्याच्यात काय चुकीचं आहे. तुम्ही गुन्हा थोडी केला आहे. तुम्ही काम केलंय ना! तुम्ही कलेच्या माध्यमातून काम केलंय. लोकांची सेवा केली आहे, लोकांना आनंद दिलाय तर मग त्याचा चेहरा बघण्यात काय वाईट आहे".