"मला आजही तो दिवस...", लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रेया घोषालची रोमॅन्टिक पोस्ट! पतीबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:46 IST2025-02-05T17:45:20+5:302025-02-05T17:46:25+5:30

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे.

bollywood singer shreya ghoshal shared romantic post for husband on the occasion of 10th wedding anniversary | "मला आजही तो दिवस...", लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रेया घोषालची रोमॅन्टिक पोस्ट! पतीबद्दल म्हणाली...

"मला आजही तो दिवस...", लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रेया घोषालची रोमॅन्टिक पोस्ट! पतीबद्दल म्हणाली...

Shreya Ghoshal Post:श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. आपल्या गोड आवाजाने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीच्या गायिकांमध्ये तिचं नाव अव्वल स्थानावर येतं. श्रेया घोषालने आतापर्यंत विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. शिवाय अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही तिने जिंकले आहेत. दरम्यान, श्रेया घोषाल तिच्या गाण्यांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. २०१५ मध्ये तिने शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केलं आणि आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. आज ५ फेब्रुवारीला त्यांच्या सुखी संसाराला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने श्रेयाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.


आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर श्रेया घोषालने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पतीसाठी रोमॅन्टिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट पाहून गायिकेचे चाहते तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर आपल्या लग्नातील सुंदर क्षण फोटोंच्या माध्यमातून दाखवत श्रेया घोषालने कॅप्शन देत म्हटलंय, "आपल्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा...! मला आजही तो दिवस आठवतो जणू हे सगळं कालच घडलंय, असं वाटतं. आपण एकमेकांसाठी आहोत हीच मुळात आनंदाची गोष्ट आहे. या प्रवासात, आम्ही आणखी एकमेकांमध्ये अडकत गेलो. शिवाय आमचा मुलगा देवयान हा देवाने आम्हाला दिलेला आणखी मोठा आशीर्वाद आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ...!"

पुढे श्रेया घोषालने लिहिलंय, "तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल मनापासून आभार...!"

कोण आहे श्रेया घोषालचा नवरा?

श्रेया घोषालचे पती शिलादित्य मुखोपाध्याय लोकप्रिय कॉलर आयडी आणि स्पॅम-ब्लॉकिंग ॲप Truecaller मध्ये एका मोठ्या पदावर कार्यरत आहेत.  शिलादित्य एप्रिल 2022 पासून ट्रूकॉलर फॉर बिझनेसचे ग्लोबल हेड म्हणून कंपनीत काम करत आहेत. 

Web Title: bollywood singer shreya ghoshal shared romantic post for husband on the occasion of 10th wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.