'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १० दिवसांत पार केला १०० कोटींचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 12:53 IST2024-03-18T11:48:06+5:302024-03-18T12:53:17+5:30
Shaitaan Box office collection: हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. त्यामुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास सगळेच रेकॉर्ड मोडीत काढायला सुरुवात केली आहे.

'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १० दिवसांत पार केला १०० कोटींचा टप्पा
सध्या बॉक्स ऑफिसवर अजय देवगण (ajay devgn) आणि आर. माधवन (r.madhavan) यांचा 'शैतान' (Shaitaan) हा सिनेमा जबरदस्त गाजत आहे. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्याची प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर अनेकांनी या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंगसुद्धा केलं होतं. विशेष म्हणजे हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वीरित्या घोडदौर करत आहेत. या सिनेमाने अवघ्या काही दिवसांमध्ये १०० कोटींचा आकडा पार केला आहे.
शैतान रिलीज झाल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा आणि अदा शर्माचा बस्तर; द नक्सल स्टोरी हे सिनेमा रिलीज झाले होते. मात्र, या सिनेमांमुळे शैतानच्य कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. या सिनेमाची यशस्वी घोडदौड बॉक्स ऑफिसवर कायम आहे. या सिनेमाने रिलीजच्या १० व्या दिवशीही कमाईची आकडेवारी कायम ठेवली आहे.
किती आहे शैतानचं बॉक्स ऑफिस कलेक्शन?
शैतान हा सिनेमा ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यावेळी पहिल्याच दिवशी या सिनेमाने १४.७५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने १८.७५ कोटी रुपये कमवले. इतकंच नाही तर या सिनेमाच्या कमाईची घोडदौड अद्यापही सुरु आहे. या सिनेमाने अनुक्रमे तिसऱ्या दिवशी २०.५ कोटी, चौथ्या दिवशी ७.२५ कोटी रुपये, पाचव्या दिवशी ६.५ कोटी, सहाव्या दिवशी ६.२५ कोटी आणि सातव्या दिवशी ५.७५ कोटींची कमाई केली.
'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने रिलीजच्या १० व्या दिवशी ९.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे एकंदरीत या सिनेमाने १० दिवसांमध्ये टोटल १०३.०५ कोटींची कमाई केली आहे. इतकंच नाही तर हा सिनेमा विदेशातही गाजत आहे. या सिनेमाची वर्ल्ड वाइल्ड कमाई १३७.९८ कोटी रुपये इतकी आहे.