बॉलिवूडचा शापित सिनेमा! शूटिंगदरम्यान दिग्दशर्कासह दोन मुख्य कलाकारांचा झालेला मृत्यू; २४ वर्षांनी पूर्ण झाला, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:59 IST2025-11-05T16:37:28+5:302025-11-05T16:59:29+5:30
शूटिंगदरम्यान दिग्दशर्कासह मुख्य कलाकार जीवाला मुकले! २४ वर्षे रखडलेला सिनेमा, कारण...

बॉलिवूडचा शापित सिनेमा! शूटिंगदरम्यान दिग्दशर्कासह दोन मुख्य कलाकारांचा झालेला मृत्यू; २४ वर्षांनी पूर्ण झाला, पण..
Bollywood Film Love And God: तंत्रज्ञानामुळे आज सगळ्याच क्षेत्रांचा चेहरामोहरा बदलतोय. अभिनय क्षेत्रही याला अपवाद नाही. मात्र, बदलत्या काळात,अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जमान्यात काही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर यश मिळूनही प्रेक्षकांमध्ये चर्चा होते. तर काही चित्रपट फारसे चालले नाहीतरी सुद्धा त्यांची चर्चा होते असते. हिंदी सिनेसृ्ष्टीत आजवर अनेक चित्रपट आले,मात्र, एक असा सिनेमा ज्याच्या निर्मितीसाठी बराच काळ लागला होता.पूर्वीच्या काळी एक चित्रपट बनवण्यासाठी ५-६ वर्ष लागत असत. पण, या सिनेमाच्या निर्मितीसाठी २४ वर्ष लागली. इतकंच नाही या चित्रपटाला शापित सिनेमा म्हणून बोललं गेलं होतं.
या चित्रपटाचं नाव 'लव्ह अॅंड गॉड' असं आहे. साल १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बनवण्यात २४ वर्ष लागली आणि या काळात अनेक दुर्दैवी घटना घडल्या. के.असिफ दिग्दर्शित या सिनेमाची त्याकाळी खूप चर्चा झाली. त्यांनी यापूर्वी मुघल ए आझाम सारखा सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिला होता. दरम्यान, त्यावेळी या चित्रपटासाठी अभिनेते गुरु दत्त यांची प्रमुख भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.मात्र, शूटिंगदरम्यान, १९६४ साली त्यांचं निधन झालं. तेव्हा ५० टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं. असं असतानाही असिफ यांनी हार मानली नाही. ते पुन्हा त्याच जिद्दीने उभे राहिले आणि त्यांनी संजीव कुमार यांना घेऊन चित्रीकरणाला सुरुवात केली. पण, नियतीला हे काही मान्य नव्हतं.चित्रीकरण सुरु असताना दिग्दर्शक असिफ यांचं निधन झालं. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.
आसिफ यांच्या मृत्यूमुळे चित्रपटाच्या चित्रीकरणात आणखी अडथळा निर्माण झाला. आर्थिक अडचणी वाढल्या मात्र या सगळ्यातून मार्ग आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असिफ यांच्या पत्नी पुढे सरसावल्या. अखेरीच मोठ्या प्रयत्नानंतर हा चित्रपट १९८६ मध्ये रिलीज झाला.पण, त्यापूर्वी अभिनेते संजीव कपूर यांचं निधन झालं होतं.
एकामागोमाग दोन मोठे कलाकार आणि दिग्दर्शक गमावल्यानंतर, हा चित्रपट अपशकुनी समजला जाऊ लागला.