जुनैद खानच्या 'लव्हयापा'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; पहिल्या दिवशी केली फक्त 'एवढी' कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:14 IST2025-02-08T10:12:12+5:302025-02-08T10:14:57+5:30
'लव्हयापा'ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या.

जुनैद खानच्या 'लव्हयापा'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; पहिल्या दिवशी केली फक्त 'एवढी' कमाई
Loveyapa Box Office Collection:जुनैद खान (Junaid Khan) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor)स्टारर 'लव्हयापा' हा सिनेमा ७ फेब्रुवारी २०२५ ला जगभरात प्रदर्शित झाला. दिग्दर्शक अद्वैत चंदन यांचा 'लव्हयापा' (Loveyapa) हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ 'लव्ह टुडे'चा रिमेक आहे. नव्या पिढीची हटके प्रेमकहाणी प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
'सॅल्कनिक'च्या रिपोर्टनुसार, जुनैद खानच्या लव्हयावा सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त १.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अपेक्षेपेक्षा ही कमाई खूपच कमी आहे. परंतु या आकड्यांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. कमाईचे आकडे पाहता चित्रपटाची सुरुवात निराशाजनक झाल्याचे समोर आलं आहे. मात्र, शनिवार व रविवारी वीकेंडला कमाईत वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच येत्या आठवड्यात चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'लव्हयापा' सिनेमात जुनैद खान, खुशी कपूर आणि आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका दिसतेय. याशिवाय कॉमेडियन किकू शारदाही सिनेमात खास भूमिकेत दिसतोय. हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ७ फेब्रुवारीला रिलीज झाला आहे.