"संजय कपूरने माधुरीच्या कानशिलात...", दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सांगितला 'राजा'मधील तो किस्सा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:48 IST2025-01-08T11:44:03+5:302025-01-08T11:48:15+5:30

'दिल बेटा', 'मन' आणि 'धमाल' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक इंद्र कुमार सध्या चर्चेत आले आहेत.

bollywood director indra kumar reveals about sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie scene entire theatre clapped film become hit | "संजय कपूरने माधुरीच्या कानशिलात...", दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सांगितला 'राजा'मधील तो किस्सा, म्हणाले...

"संजय कपूरने माधुरीच्या कानशिलात...", दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी सांगितला 'राजा'मधील तो किस्सा, म्हणाले...

Raja Movie: 'दिल, 'बेटा', 'मन' आणि 'धमाल' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक इंद्र कुमार (Indra Kumar) सध्या चर्चेत आले आहेत. अलिकडेच त्यांनी आपल्या इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. याचदरम्यान, इंद्र कुमार यांनी 'राजा' चित्रपटाची एक आठवण शेअर केली आहे. १९९५ मध्ये इंद्र कुमार यांचा 'राजा' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण, प्रदर्शनानंतर हा चित्रपट फ्लॉप होईल का? याची भीती इंद्र कुमार यांना सतावत होती. याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला.

अलिकडेच इंद्र कुमार यांनी सिद्धार्थ कन्नन यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 'राजा' चित्रपटादरम्यानचा एक किस्सा शेअर केला. त्यावेळी मुलाखतीमध्ये इंद्र कुमार म्हणाले, "राजा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होऊनही मी पुन्हा त्यातील काही सीन्स री-शूट केले होते. कारण या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर  जेव्हा मी त्यातील काही सीन्स पाहिले तर ते मलाच समजत नव्हते. त्यामुळे मला माझीच चूक लक्षात आली आणि मी पुन्हा स्क्रिप्ट लिहिली. त्यामुळे चित्रपट सुपरहिट ठरला. पण राजा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांपूर्वी संजय कपूरचा प्रेम हा सिनेमा रिलीज झाला होता. परंतु हा सिनेमा फ्लॉप झाला."

पुढे ते म्हणाले, "जेव्हा थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला गेलो तेव्हा संजय कपूरमुळे लोक माझी खिल्ली उडवत होते. मी पण आशा सोडली होती. तेव्हा मी माझ्या मनात विचार आला की हा आपला शेवटचा सिनेमा असेल, यानंतर मला थेट हरिद्वारला निघून जावं लागणार आहे. पण खरंच माझं नशीब खूप चांगलं होतं म्हणून राजा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. मी जेव्हा नॉव्हेल्टी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहत बसलो होतो, तर तेव्हा लोक संजय कपूरबद्दल बोलत होते. थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता."

'राजा' चित्रपटातील एक सीनबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं,"राजा' मध्ये एक सीन होता ज्यामध्ये माधुरी संजय कपूरचे चित्रपटातील भाऊ परेश रावल यांच्यावर आरोप करते. त्या सीनमध्ये अभिनेता माधुरीच्या कानशिलात लगावतो आणि आपल्या भावाची बाजू घेतो. या एका सीनवर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. "तुम जैसी १००० लडकियां कुर्बान करता हूं अपने भाई पर..." या एका डायलॉगवर प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. ही स्क्रिप्टची ताकद होती."

Web Title: bollywood director indra kumar reveals about sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie scene entire theatre clapped film become hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.