अरबाजच्या दुसऱ्या लग्नात सलमानची हवा; भाईजानच्या डान्सने निकाहला लागले चार चाँद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 14:25 IST2023-12-25T14:24:51+5:302023-12-25T14:25:34+5:30
Salman khan: सध्या सोशल मीडियावर सलमानच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अरबाजच्या दुसऱ्या लग्नात सलमानची हवा; भाईजानच्या डान्सने निकाहला लागले चार चाँद
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (arbaaz khan) याने नुकताच शूरा खान हिच्यासोबत निकाह केला आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी अरबाजने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली असून त्यांच्या निकाहची सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली आहे. या निकाह सोहळ्यात अरबाजच्या संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली होती. यावेळी सलमानने आपल्या भावाच्या लग्नात जबरदस्त डान्स करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं.
सध्या सोशल मीडियावर अरबाज-शूराच्या निकाहचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने निकाह केलं. विशेष म्हणजे या सोहळ्यात अरबाजचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. या लग्नात सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं असून सलमानच्या एका फॅन पेजवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात सलमान दिल दियां गल्ला, तेरे मस्त, मस्त दो नैन या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर, शूरा, अरहान आणि अन्य पाहुण्यांनीही त्याची साथ दिली.
★ ADORING… #SalmanKhan Dancing on #TereMastMast at #ArbaazKhan’s Wedding!
— SalmanKhanHolics.com (@SalmanKhanHolic) December 24, 2023
-Dec 24, 2023https://t.co/O9rgzDWGkCpic.twitter.com/aliMrhQTey
दरम्यान, अरबाजने १९९८ मध्ये मलायका अरोरासोबत लग्न केलं होतं. जवळपास १९ वर्ष संसार केल्यानंतर ही जोडी विभक्त झाली.त्यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत होता. मात्र, त्यानंतर त्याने शूराला डेट करायला सुरुवात केली. अखेर २४ डिसेंबर रोजी अरबाजने शूरासोबत निकाह केला.