दोन वेण्यांमधल्या 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 07:00 AM2022-01-26T07:00:00+5:302022-01-26T07:00:03+5:30

Bollywood And South Popular Actress Childhood Photo: सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो(Bollywood Celebs Childhood Photos)  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Bollywood and south popular actress childhood school days photos went viral on social media | दोन वेण्यांमधल्या 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका

दोन वेण्यांमधल्या 'या' क्यूट मुलीला ओळखलंत का?, साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आहे तिचा डंका

googlenewsNext

Bollywood And South Popular Actress Childhood Photo: सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो(Bollywood Celebs Childhood Photos)  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याच क्रमात पुन्हा एकदा एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो (Bollywood Actress Childhood Photo)  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतायेत.  या फोटोत ती  शाळेच्या गणवेशात दिसत आहे आणि दोन वेण्यांमध्ये ती खूपच गोंडस दिसत आहे. पण ती कोण आहे हे ओळखणे अनेकांना कठीण जात आहे.

 

फोटोमध्ये आपल्या क्यूटनेसने सर्वांची मनं जिंकणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून साऊथ  (South) आणि बॉलिवूड अभिनेत्री  (Bollywood Actress) तापसी पन्नू (Taapsee Pannu)आहे. या फोटोत दिसत आहे की तापसी पन्नू शाळेत झालेल्या स्पोर्ट्समध्ये पहिली आली आहे. फोटोमध्ये थोडेसे स्मितहास्य करून, ती तिच्या बक्षीससह उभी आहे. तापसी पन्नूचा हा फोटो (Taapsee Pannu Photo) चाहत्यांना खूप आवडला आहे, चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले - लहानपणीही तू खूप क्यूट दिसायचीस. 

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर, तापसी पन्नू शेवटची हसीन दिलरुबा(Haseen Dillruba) मध्ये विक्रांत मेसी  (Vikrant Massey) आणि हर्षवर्धन राणेHarshvardhan Rane) सोबत दिसली होती. तापसी पन्नूची गणना अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केली जाते ज्या सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असतात. तापसी पन्नूची प्रत्येक पोस्ट चाहत्यांना खूप आवडते आणि ती लगेच व्हायरल होते.

Web Title: Bollywood and south popular actress childhood school days photos went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.