शाहरुख-सलमानला मागे टाकत अक्षय बनला NO.1; जाणून घ्या, तुमचा फेव्हरिट अ‍ॅक्टर कोणत्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:57 IST2023-01-09T14:55:59+5:302023-01-09T14:57:54+5:30

...याशिवाय टॉप 10 च्या या यादीत कार्तिक आर्यनचेही नाव समोर आले आहे.

Bollywood Akshay kumar becomes most favorite hindi film actor know about the shah rukh khan and salman khan number | शाहरुख-सलमानला मागे टाकत अक्षय बनला NO.1; जाणून घ्या, तुमचा फेव्हरिट अ‍ॅक्टर कोणत्या क्रमांकावर

शाहरुख-सलमानला मागे टाकत अक्षय बनला NO.1; जाणून घ्या, तुमचा फेव्हरिट अ‍ॅक्टर कोणत्या क्रमांकावर

नवी दिल्ली - मीडिया इनसाइट्स फर्म ऑरमॅक्सने डिसेंबर 2022 मधील टॉप 10 मोस्ट पॉप्युलर मेल हिंदी फिल्म अ‍ॅक्टर्सची यादी जारी केली आहे. यात बॉलिवुड अ‍ॅक्टर शाहरुख खान आणि सलमान खान यांचेही नाव आहे. मात्र सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या क्रमांकावर अक्षय कुमारचे नाव आले आहे. तसेच शाहरुख दुसऱ्या स्थानावर तर सलमान तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय टॉप 10 च्या या यादीत कार्तिक आर्यनचेही नाव समोर आले आहे.

जाणून घ्या कोणत्या क्रमांकावर तुमचा फेव्हरिट अ‍ॅक्टर - 
ऑरमॅक्सने जारी केलेल्या यादीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सेलेब्सचे चित्रपट आणि जाहिरातींच्या आधारे, तसेच त्यांची संपूर्ण ब्रँड व्हॅल्यू लक्षात घेत पहिल्या क्रमांकावर अक्षय कुमार, दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान, तिसऱ्या क्रमांकावर सलमान खान, चौथ्या क्रमांकावर ऋतिक रोशन, पाचव्या क्रमांकावर रणबीर कपूर, सहाव्या क्रमांकावर अजय देवगन, सातव्या क्रमांकावर रणवीर सिंह, आठव्या क्रमांकावर वरुण धवन, नव्या क्रमांकावर आमिर खान तर कार्तिक आर्यन 10व्या क्रमांकावर आहे.

चित्रपटांसंदर्भात बोलायचे झाल्यास शाहरुख खानने गेल्या 4 वर्षांत चित्रपट केलेले नाहीत. मात्र, 25 जानेवारीला त्याचा पठान नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर अक्षय कुमारच्या 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या रक्षाबंधन आणि राम सेतू चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही. मात्र, या वर्षात त्याचे सेल्फी, OMG2, आणि बडे मियां छोटे मियां 2 सारखे बिग बजेट चित्रपट रिलीज होत आहेत. यामुळे चाहते खुश आहेत. तसेच, सलमान खानसंदर्भात बोलायचे झाल्यास, चाहते दबंग खानच्या टायगरच्या सिक्वलची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Bollywood Akshay kumar becomes most favorite hindi film actor know about the shah rukh khan and salman khan number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.