यामी गौतम अन् प्रतीक गांधीच्या 'धूम धाम' सिनेमाचा टीझर रिलीज; केमिस्ट्रीची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:38 IST2025-01-20T14:35:54+5:302025-01-20T14:38:16+5:30

'धूम धाम' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज.

bollywood actress yami gautam and pratik gandhi dhoom dhaam netflix movie poster released | यामी गौतम अन् प्रतीक गांधीच्या 'धूम धाम' सिनेमाचा टीझर रिलीज; केमिस्ट्रीची होतेय चर्चा

यामी गौतम अन् प्रतीक गांधीच्या 'धूम धाम' सिनेमाचा टीझर रिलीज; केमिस्ट्रीची होतेय चर्चा

Dhoom Dhaam Movie: अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) चित्रपट 'आर्टिकल ३७०'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळाला. या चित्रपटात तिने केलेल्या कामाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. त्यानंतर आता पुन्हा अभिनेत्री प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. नुकतंच यामी गौतमचा आगामी चित्रपट 'धूम धाम' चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) तिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे. नुकतीच सोशल मीडियावर नेटफ्लिक्सद्वारे या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या रोमकॉम चित्रपटातील यामी आणि प्रतीक गांधीची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. 



सोशल मीडियावर 'धूम धाम' च्या टीझर नेटफ्लिक्सद्वारे शेअर करण्यात आला आहे. इस व्हेलेंटाईन डे पर वीर और कोयल की शादी मनाई जाएगी धूम धाम और धमाके के साथ! असं कॅप्शन देत या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये रोमान्स आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे, असा अंदाज आहे. दरम्यान, हा चित्रपट येत्या व्हेलेंटाइनच्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी २०२५ ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

वर्कफ्रंट

अलिकडेच यामी गौतम २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आर्टिकल ३७०' मध्ये पाहायला मिळाली. यामीबरोबर चित्रपटात वैभव तत्ववादी आणि प्रिया मणि, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर प्रतिक गांधी 'अग्नी' चित्रपटामध्ये झळकला होता. हा चित्रपट अग्निशमन दलातील वीर जवानांच्या जीवनावर आधारलेला आहे. 

Web Title: bollywood actress yami gautam and pratik gandhi dhoom dhaam netflix movie poster released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.