लग्नाची पहिली रात्र अन्...; यामी गौतम अन् प्रतीक गांधीच्या 'धूम धाम' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:22 IST2025-01-27T17:17:52+5:302025-01-27T17:22:42+5:30
'धूम धाम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज.

लग्नाची पहिली रात्र अन्...; यामी गौतम अन् प्रतीक गांधीच्या 'धूम धाम' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Dhoom Dhaam Trailer: अभिनेत्री यामी गौतम (YamiGautam) 'आर्टिकल-३७०' नंतर धूम धाम या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या व्हेलेंटाईन-डे च्या दिवशी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये यामी आणि प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या रोमकॉम चित्रपटातील यामी आणि प्रतीक गांधीची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अलिकडेच 'धूम धाम' चा टीझर रिलीज झाला. जो थ्रिलसोबतच सस्पेन्सनेही परिपूर्ण आहे. त्यानंतर चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. जो थ्रिलसोबतच सस्पेन्सने परिपूर्ण आहे. "शादी की पहली रात और साथ में अनएक्सेप्टेड बारात..." असं कॅप्शन देत नेटफ्लिक्सद्वारे सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आहे.
'धूम धाम' या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषी सेठ यांनी केलं असून यामी गौतमने यामध्ये कोयल नावाच्या एका बिनधास्त मुलीचं पात्र साकारलं आहे. तर प्रतीक गांधी घाबरट स्वभावाच्या 'वीर' ची भूमिका साकारतो आहे. शिवाय या चित्रपटात एजाज खान, प्रतीक बब्बर यांची झलक पाहायला मिळते आहे.
'धूम धाम' या चित्रपटामध्ये रोमान्स आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे, हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी 'OTT 'प्लॅटफॉर्म 'Netflix' वर प्रदर्शित करण्यात येईल. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वर्कफ्रंट
अलिकडेच यामी गौतम २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आर्टिकल ३७०' मध्ये पाहायला मिळाली. यामीबरोबर चित्रपटात वैभव तत्ववादी आणि प्रिया मणि, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर प्रतिक गांधी 'अग्नी' चित्रपटामध्ये झळकला होता. हा चित्रपट अग्निशमन दलातील वीर जवानांच्या जीवनावर आधारलेला आहे.