अभिनयानंतर आता बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार गायन क्षेत्रात पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 17:11 IST2019-04-16T17:11:07+5:302019-04-16T17:11:41+5:30
बॉलिवूडमध्ये कलाकाराने आपल्या सिनेमातील गाणी गाण्याचा ट्रेंड आहे. सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट, परिणीती चोप्रा, प्रियंका चोप्रा व श्रद्धा कपूर यांच्यासोबतच काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या सिनेमातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे.

अभिनयानंतर आता बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार गायन क्षेत्रात पदार्पण
बॉलिवूडमध्ये कलाकाराने आपल्या सिनेमातील गाणी गाण्याचा ट्रेंड आहे. सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट, परिणीती चोप्रा, प्रियंका चोप्रा व श्रद्धा कपूर यांच्यासोबतच काही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या सिनेमातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. या कलाकारांच्या यादीत तारा सुतारियाच्या नावाचादेखील समावेश आहे. तारा सुतारिया लवकरच 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटाच्या सीक्वलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि 'आरएक्स १००' चित्रपटातून ती गायन क्षेत्रात एन्ट्री करणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ताराने 'स्टुडंट ऑफ द इयर २'च्या ट्रेलर लाँचवेळी लग जा गले गाणे गाऊन सर्वांना थक्क केले होते. तसेच तिने कॉफ विद करण शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी टायगर श्रॉफ व अनन्या पांडेदेखील उपस्थित होते. त्यावेळी देखील तिने गाणे गाऊन सर्वांना खूप इम्प्रेस केले होते. ताराच्या या टॅलेंटने निर्मात्यांनादेखील भुरळ पाडली आहे.
तारा स्टुडंट ऑफ द इयरनंतर 'आर एक्स १००' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आहान शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा अॅक्शन चित्रपट असून यातील रोमँटिक गाण्याला ती स्वरसाज देणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, साजिदने दिग्दर्शक मिलन लुथरियासोबत या गाण्याबाबत चर्चा केली आहे.
ताराला या गाण्याबाबत सांगितल्यानंतर ती गाणे गाण्यासाठी तयारदेखील झाले आहे. तारा प्रशिक्षित गायिका असून भविष्यात तिला अल्बमदेखील लाँच करायचा आहे.