"तुला प्रेम अन्...", रुमर्ड बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी तृप्ती डिमरीची रोमँटिक पोस्ट; चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:34 IST2025-01-30T14:31:52+5:302025-01-30T14:34:21+5:30
तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हे नाव आता मनोरंजनविश्वात लोकप्रिय झालं आहे.

"तुला प्रेम अन्...", रुमर्ड बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी तृप्ती डिमरीची रोमँटिक पोस्ट; चर्चेला उधाण
Tripti Dimri: तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हे नाव आता मनोरंजनविश्वात लोकप्रिय झालं आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' सिनेमामुळे तिच्याबद्दल सगळीकडे चर्चा सुरु होती. या चित्रपटामध्ये रणबीर कपूरसोबत तिने दिलेल्या इंटीमेट सीन्समुळे तृप्तीने प्रेक्षकांचं लक्ष आपल्यकडे वेधून घेतलं. त्यानंतरही तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या. दरम्यान, तृप्ती तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही अधिक चर्चा रंगली आहे. तिचं नाव बऱ्याच लोकांसोबत जोडण्यात आलं. अनुष्का शर्माच्या भावानंतर तृप्ती एका श्रीमंत उद्योगपतीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून तृप्ती डिमरीच्या अफेअरबाबत अधिकच बोललं जात आहे. अभिनेत्री सॅम मर्चंटला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अलिकडेच त्यांचे इंग्लंड व्हेकेशनचे फोटो समोर आल्याने चर्चांना आणखी उधाण आलं. त्यात तृप्तीने तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड सॅम मर्चंटच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तृप्ती सॅमबरोबर पाहायला मिळत आहे. "हॅप्पी बर्थडे सॅम मर्चंट, तुला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा...!" असं कॅप्शन देत तिने ही स्टोरी शेअर केली आहे. त्यामुळे तृप्ती डिमरीच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा होऊ लागली आहे.
वर्कफ्रंट-
तृप्ती डिमरी ही बॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री आहे. 'लैला मजनू', 'पोस्टर बॉईज' 'काला','बुलबुल', 'बॅड न्यूज,'अॅनिमल' या चित्रपटांतून अभिनेत्री तृप्ती डिमरीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर अलिकडेच आलेल्या भुल भूलैय्या सिनेमामुळे तिचं सर्वत्र झालं.