बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:58 IST2025-06-11T10:46:25+5:302025-06-11T10:58:06+5:30

या बॉलिवूड अभिनेत्रीने मराठी सिनेमातही काम केलंय. अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान झाल्याने तिचे चाहते हळहळ व्यक्त करत आहे

Bollywood actress tannishtha chatterjee diagnosed with breast cancer at age 45 | बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...

लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणजे तनिष्ठा चॅटर्जी. तनिष्ठाच्या (tannistha chatterjee) आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तनिष्ठाला कॅन्सरचं निदान झालं असून ती पूर्णपणे कोसळली आहे. तनिष्ठाला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तनिष्ठाच्या वडिलांचं काहीच दिवसांपूर्वी निधन झालं. आणि अशातच अभिनेत्रीला कॅन्सरचं झाल्याने तिच्या चाहत्यांना आणि तिच्या कुटुंबाला चांगलाच धक्का बसला. तनिष्ठाला तिच्या मुलीची यामुळे काळजी वाटली असून अभिनेत्रीने तिला अमेरिकेला पाठवलं आहे.

तनिष्ठा कॅन्सरबद्दल काय म्हणाली?

तनिष्ठाने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कॅन्सरबद्दल तिचं मत व्यक्त केलं. तनिष्ठा म्हणाली, "चार महिन्यांपूर्वी मला कॅन्सरविषयी कळालं. गेल्या वर्षी माझ्या वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं. मी त्या दुःखातून सावरत असतानाच मला माझ्या कॅन्सरबद्दल कळालं. माझं आयुष्य काहीसं उध्वस्त झालं आहे. मी वारंवार कणखर बनून आता थकली आहे. जेव्हा वडिलांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या निधनाचा शोक मी व्यक्त केला नाही. कारण मला माझ्या ७० वर्षांच्या आईला आणि ९ वर्षांच्या लेकीला सांभाळायचं होतं. जेव्हा मला कॅन्सर झाला हे समजलं तेव्हा मी विचार केला हे माझ्यासोबत असं का झालं? मी पूर्ण कोसळून गेले होते."


लेकीला अमेरिकेत पाठवलं

तनिष्ठाने कॅन्सर झालाय हे समजताच तिने लेकीला अमेरिकेत बहिणीकडे पाठवलं आहे. ती म्हणाली, "मुलीला माझ्यापासून लांब जायचं नव्हतं. परंतु तिचं बालपण वाईट होईल, अशी माझी इच्छा नव्हती. तिला एकटं वाटेल, असं मला काही करायचं नव्हतं. माझ्याशिवाय तिच्यावर प्रेम करणारी खूप माणसं आहेत, हे मला तिला जाणवू द्यायचं होतं." अशाप्रकारे तनिष्ठाने कॅन्सरची दुःखद कहाणी सर्वांसोबत शेअर केली. तनिष्ठाने 'डॉक्टर रखमाबाई' या मराठी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय 'अनइंडियन', 'रीना', 'स्कोप', 'सिद्धार्थ' अशा लोकप्रिय सिनेमात ती झळकली आहे.

Web Title: Bollywood actress tannishtha chatterjee diagnosed with breast cancer at age 45

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.