"त्या पात्राची गरज...", 'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमधून पत्ता कट झाल्यावर सोनाक्षीचं वक्तव्य, काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:02 IST2025-06-25T12:47:12+5:302025-06-25T13:02:00+5:30

'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमधून सोनाक्षीचा पत्ता कट? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली...

bollywood actress sonakshi sinha talk about ajay devgn starrer son of sardaar 2 casting says | "त्या पात्राची गरज...", 'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमधून पत्ता कट झाल्यावर सोनाक्षीचं वक्तव्य, काय म्हणाली?

"त्या पात्राची गरज...", 'सन ऑफ सरदार'च्या सीक्वलमधून पत्ता कट झाल्यावर सोनाक्षीचं वक्तव्य, काय म्हणाली?

Sonakshi Sinha : अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर 'सन ऑफ सरदार' हा  चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजयसह सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), संजय दत्त आणि  जुही चावला असे कलाकार झळकले. दरम्यान, सन ऑफ सरदारच्या यशानंतर जवळपास १३ वर्षानंतर या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे. परंतु,  या सीक्वलमध्ये सोनाक्षी सिन्हा चित्रपटात नाहीये. त्यामुळे चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. त्यात आता स्वतः अभिनेत्रीने यामागील कारण सांगितलं आहे.

दरम्यान, अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार' चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. अवघ्या ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने जवळपास  १६१ कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटातील सोनाक्षी आणि  अजयची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. मात्र, सन ऑफ सरदार मध्ये सोनाक्षी सिन्हा नसणार आहे. या मागे नेमकं काय आहे. याबद्दल एका मुलाखतीत स्वत सोनाक्षीने खुलासा केला आहे. त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "मी याबद्दल काहीच सांगू शकत नाही, हा चित्रपट मी बनवला नाहीये. कदाचित या चित्रपटाची कथा वेगळी असेल. शिवाय त्यात माझ्या पात्राची गरज नसेलही. असा खुलासा तिने केला. त्याचबरोबर सोनाक्षीने असेही संकेत दिले की चित्रपटाच्या पटकथेत बदल झाल्यामुळे तिला बदलण्यात आले नाही, उलट यावेळी तिचे पात्र कथेत बसत नव्हते.

नीरू बाजवा साकारणार ही भूमिका

सन ऑफ सरदार २ मध्ये मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. मात्र प्रोजेक्टशी संबंधित एका जवळच्या सूत्राने डीएनएकडे खुलासा केला आहे की मृणाल ही चित्रपटातील एकमेव मुख्य अभिनेत्री नाही. वृत्तानुसार, पंजाबी स्टार अभिनेत्री नीरू बाजवा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

निकिता रॉयमध्ये सोनाक्षी दिसणार...

सोनाक्षीचा 'निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस' हा चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट तिचा भाऊ कुश सिन्हा दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट एक रहस्यमय थ्रिलर आहे आणि सोनाक्षी त्यात पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: bollywood actress sonakshi sinha talk about ajay devgn starrer son of sardaar 2 casting says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.