"त्याने माझ्यासमोर प्रायव्हेट पार्ट...", सोहा अली खानसोबत दिवसाढवळ्या घडलेला किळसवाणा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:14 IST2025-09-15T15:06:16+5:302025-09-15T15:14:50+5:30

"त्याने माझ्यासमोर प्रायव्हेट पार्ट...", दिवसाढवळ्या सोहा अली खानसोबत अज्ञाताने केलेलं असं काही; सांगितला'तो' प्रसंग

bollywood actress soha ali khan shares horrifying incident in italy trip says | "त्याने माझ्यासमोर प्रायव्हेट पार्ट...", सोहा अली खानसोबत दिवसाढवळ्या घडलेला किळसवाणा प्रकार

"त्याने माझ्यासमोर प्रायव्हेट पार्ट...", सोहा अली खानसोबत दिवसाढवळ्या घडलेला किळसवाणा प्रकार

Soha Ali Khan:बॉलिवूड इंडस्ट्रीतील पतौडी घराणं हे कायम चर्चेत असतं. या कुटुंबातील लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक सदस्याची चाहत्यांमध्ये चर्चा असते.सध्या अभिनेता सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने तिने दिलेल्या मुलाखतीमुळे अनेकांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेतलं आहे. दरम्यान, सोहा अलीने खानने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये परदेशात तिच्यासोबत घडलेल्या विचित्र घटनेबद्दल खुलासा केला आहे. परदेशात असताना एका अज्ञाताने तिच्यासमोर

दिवसाढवळ्या संतापजनक कृत्य केलं होतं, असं तिने सांगितलं. अभिनेत्री सोहा अली खानने नुकताच हाऊटरफ्लाईसोबत संवाद साधला. इटलीमध्ये ट्रीपला गेली असताना तिथे एका व्यक्तीने तिच्यासमोर प्रायव्हेट पार्ट दाखवत अश्वील चाळे केले होते. त्या घटनेविषयी बोलताना सोहा म्हणाली,"इटलीमध्ये माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली होती. अनेकदा अशा घटना आपल्या कानावर येत असतात. पण दिवसाढवळ्या? यामागे त्यांचा हेतू काय असेल? मला हे आजपर्यंत कळलं नाही. शिवाय मला त्याबद्दल जाणूनही घ्यायचं नाही."

कास्टिंग काउचबद्दल सोहा काय म्हणाली...

याबद्दल सोहा अली खानने स्पष्ट शब्दांत उत्तर देत सांगितलं की,"एक फिल्मी बॅकग्राउंड असल्यामुळे कुठेतरी मला त्याचा फायदाच झाला. कारण, त्यामुळे अशा प्रकरणांपासून मी वाचले. सैफ अली खान आणि शर्मिला जी यांच्यामुळे मी वाचले. पण, खरं सांगायचं तर मला असा कोणताही अनुभव आलेला नाही." असा खुलासा अभिनेत्रीने केला.

सोहा अली खान 'दिल मांगे मोअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र,'रंग दे बसंती'चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली.'साहेब बिवी और गॅंगस्टार','मुंबई मेरी जान'या चित्रपटांणमध्येही तिने काम केलं आहे. त्यानंतर बराच काळ ती सिनेविश्वापासून दूर होती. अलिकडेच ती 'छोरी-२' चित्रपटात पाहायला मिळाली.

Web Title: bollywood actress soha ali khan shares horrifying incident in italy trip says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.