केवळ सौंदर्यच नाही, शिल्पाचा फिटनेसही कमाल! स्वत:ला ठेवते स्लिम ट्रिम, रोज न चुकता पिते 'हे' खास ड्रिंक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:57 IST2025-09-01T14:54:39+5:302025-09-01T14:57:37+5:30
Shilpa Shetty Fitness Secret: वयाच्या पन्नशीतही तरूणींना लाजवेल असा आहे शिल्पा शेट्टीचा फिटनेस; जाणून घ्या तिचं रोजचं रूटीन

केवळ सौंदर्यच नाही, शिल्पाचा फिटनेसही कमाल! स्वत:ला ठेवते स्लिम ट्रिम, रोज न चुकता पिते 'हे' खास ड्रिंक
Shilpa Shetty Fitness:बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासह फिटनेससाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. तिची फिटनेस जर्नी चाहत्यांसाठी प्रेरणा आहे. वयाच्या पन्नाशीतही ती इतकी फिट आणि सुंदर कशी असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. ती अनेकांसाठी फिटनेस आयकॉन आहे. मात्र, तिचा फिटनेस मंत्रा म्हणजे केवळ एक्सरसाईज, डाएट नाही आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिचा फिटनेस मंत्रा सांगितला.
शिल्पाच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने होते. 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने सांगितलं होतं की, मी माझ्या दिवसाची सुरुवात दीड ग्लास पाणी पिऊन करते. त्यानंतर मग, मी चार थेंब नोनी ज्यूस पिते जो एनर्जी बूस्ट करण्याचं काम करतो. शेवटी, मी एक चमचा नारळाच्या तेलाने गुळण्या करते. ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे.
त्यानंतर शिल्पाने सांगितलं, मी नाश्त्याची वेळ कधीच चुकवत नाही. कारण, कामातून मला कधी वेळच मिळत नाही. त्यामुळे साधं आणि साजूक जेवण करणं मला आवडतं. मी जास्त ब्रेड खात नाही. मला ताजी फळं खाणं योग्य वाटतं. त्यातून शरीराला फायबर मिळतं. बदामाच्या दुधात थोडी मुसली, सफरचंद आणि आंब्याचे काही तुकडे मिसळून खाणं हा माझा आवडता नाश्ता आहे.
तूप जेवणातील महत्त्वाचा घटक...
आहाराबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, "तूप माझ्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे. केळीसारखी उच्च कार्बयुक्त फळे देखील शरीरासाठी चांगली आहेत. पण, बहुतेक लोक ही फळे खाणं टाळतात. कारण त्यांना भीती वाटते की ते जाड होतील. त्याचबरोबर आहारात थोडा तपकिरी ब्राऊन राईसचा समावेश करा. या अन्नपदार्थांमुळे पोट कायम भरलेलं राहतं शिवाय वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. असा खुलासा अभिनेत्रीने केला होता.