"सध्या मुलं जन्माला घालूच नका.."; बॉलिवूड अभिनेत्रीचं मोठं विधान, स्वतःच्या मुलीबद्दल काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:40 IST2025-08-07T16:38:22+5:302025-08-07T16:40:13+5:30
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सध्याच्या काळात मुलं जन्माला का घालू नये, यामागचं महत्वाचं कारण सांगितलं आहे. अभिनेत्रीचं विधान चर्चेत आहे

"सध्या मुलं जन्माला घालूच नका.."; बॉलिवूड अभिनेत्रीचं मोठं विधान, स्वतःच्या मुलीबद्दल काय म्हणाली?
'मिर्झापूर', 'बंदिश बँडिट्स' यासारख्या वेबसीरिजमध्ये झळकलेली आणि अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री म्हणजे शिबा चढ्ढा. गेल्या काही वर्षात ओटीटी विश्वावर शिबा यांच्या अभिनयाचा दबदबा आहे. शिबा या इतक्या मुलाखती देत नाहीत. पण नुकतीच शिबा यांनी एक मुलाखत दिली आहे. यात त्यांनी सध्याच्या काळात मूल नकोच, असं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाल्या शिबा चढ्ढा? जाणून घ्या
शिबा चढ्ढा आहेत सिंगल पॅरेंट्स
सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत शिबा यांनी सध्याच्या काळात मूल जन्माला घालणं का कठीण आहे हे सांगितलं आहे. शिबा म्हणतात,"सिंगल आई होणं खूप कठीण आहे. अनेक बाजूंनी हे अवघड असतं. काहीही झालं तरी तुम्हाला बाळासाठी त्याक्षणी हजर राहावं लागतं. मी प्रत्येक सिंगल आईचं दुःख समजू शकते. पूर्वी पूर्ण गाव तुमच्या बाळाची काळजी घ्यायचं. परंतु कुटुंब छोटं होत गेलं तशी समस्या आणखी वाढली. माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी मी अनेक चांगल्या ऑफर्स नाकारल्या."
"मला वाटतं सध्याच्या काळात मूल जन्माला घालूच नये. या काळात बाळाला एकट्याने सांभाळणं खूप कठीण गोष्ट आहे. अनेकदा आई-बाबा दोघांचा पगार अपुरा पडतो. आपण मुलं का जन्माला घालतो, याचा विचार लोकांनी खोलवर करायला हवा. फक्त समाज काय म्हणेल किंवा आईबाप व्हायचंच आहे या हेतूने मूल जन्माला घालणं चुकीचं आहे. त्यांच्या मते, सध्याच्या जगात मुलांना वाढवणे अधिक कठीण झाले आहे. महागाई, बदलती जीवनशैली, कुटुंबातील तणाव आणि एकटेपणा यामुळे आजच्या पालकांनी जबाबदारी घेऊनच मूल जन्माला घालावे". शिबा लवकरच 'रामायण' सिनेमात दिसणार आहेत.