"हा माझा पुनर्जन्म...", ३५ वर्षानंतर अक्षय कुमारच्या नायिकेचं चित्रपटसृष्टीत पुनरागमन, भावुक होत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 15:13 IST2025-09-14T15:05:09+5:302025-09-14T15:13:30+5:30

३५ वर्ष अभिनय क्षेत्रापासून दूर होती अक्षयची नायिका, प्रेक्षकांचं प्रेम पाहून भारावली, म्हणाली...

bollywood actress shantipriya debut with akshay kumar film now comeback after 35 years with bad girl movie | "हा माझा पुनर्जन्म...", ३५ वर्षानंतर अक्षय कुमारच्या नायिकेचं चित्रपटसृष्टीत पुनरागमन, भावुक होत म्हणाली...

"हा माझा पुनर्जन्म...", ३५ वर्षानंतर अक्षय कुमारच्या नायिकेचं चित्रपटसृष्टीत पुनरागमन, भावुक होत म्हणाली...

Bollywood Actress: चित्रपटसृष्टी म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे जोपर्यंत तुम्हाला यश मिळतं तोपर्यंत तुम्हाला लोक ओळखत असतात. मात्र, एकदा तुमचे वाईट दिवस सुरु झाले तर तुमच्याकडे पाहतही नाही. इंडस्ट्रीतील अशीच एक गुणी अभिनेत्री जिच्या आयुष्यात अशीच एक दुर्दैवी घटना घडली ज्यामुळे तिचं आयुष्य उद्धवस्त झालं. ही अभिनेत्री म्हणजे शांती प्रिया. त्यानंतर आता जवळपास ३५ वर्षानंतर ही नायिका रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.

अभिनेत्री शांति प्रियाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता. शांती प्रियाने १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सौगंध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. लग्नानंतर ती कलाविश्वापासून दुरावली. आता लवकरच ती बॅड गर्ल चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या तमिळ चित्रपटाची निर्मिती वेत्रीमारन यांनी केली आहे आणि दिग्दर्शन वर्षा भरत यांनी केलं आहे. ५ सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला आहे.  इतक्या वर्षानंतर प्रेक्षकांचं मिळणारं पाहून अभिनेत्री भारावली आहे. नुकताच तिने हिंदुस्तान टाईम्ससोबत संवाद साधला. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, " हा माझा पुनर्जन्म झाल्यासारखं मला वाटतंय. जिथे माझा प्रवास सुरू झाला होता त्या रुपेरी पडद्यावर स्वत ला पुन्हा पाहणं हा अद्भूत करणारा अनुभव आहे. त्यामुळे मला असं की मी माझ्या आईच्या घरी परतली आहे." अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.

काय घडलं होतं?

शांती प्रियाने १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सौगंध' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर ती 'मेरे सजना साथ निभाना', 'फूल और अंगार' यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकली. मात्र, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तिने १९९२ साली अभिनेता सिद्धार्थ रेसोबत लग्न केलं. लग्नानंतर शांती प्रियाने सिनेइंडस्ट्रीला रामराम केला. लग्नाच्या काही वर्षातच पती सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचं निधन झालं. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री पूर्णपणे कोलमडून गेली.

Web Title: bollywood actress shantipriya debut with akshay kumar film now comeback after 35 years with bad girl movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.